Namo Bharat Rapid Train: भारतात धावणार आता 'नमो भारत', देशातील पहिली रॅपिड ट्रेन PM मोदींकडून भेट

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या सत्रातील साहिबाबाद ते दुहाईपर्यंतच्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केलं
Namo Bharat Rapid Train
Namo Bharat Rapid TrainSaam Didital
Published On

Namo Bharat Rapid Train

देशाला आज पहिल्या रॅपिड ट्रेनची (आरआरटीएस) भेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या सत्रातील साहिबाबाद ते दुहाईपर्यंतच्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केलं. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या. शनिवारपासून सामान्य नागरिकांना या ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना नमो भारत नावं देण्यात आलं आहे. केंदीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी गुरुवारी याचं नावं बदलण्याची घोषणा केली होती.

मोदींनी २०१९ मध्ये आरआरटीएस प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर या कॉरिडॉरच्या निर्माणासाठी ३० हजार कोटींचा निधी खर्च करण्यात येत आहे. दिल्ली - गाजियाबाद - मेरठ आरआरटीएस हा पहिल्या सत्रातील कॉरिडॉर १७ किमी लांब आहे. त्यामुळे प्रवाशांना गाजियाबादच्या साहिबाबाद ते दुहाईपर्यंत प्रवास करता येणार आहे. ही ट्रेन गाजियाबाद, मुरादनगर आणि मोदीनगरहून एक तासाच्या आत दिल्लीहून मेरठला पोहोचणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Namo Bharat Rapid Train
India - Canada : भारतासमोर कॅनडा नरमला; अल्टिमेटमनंतर ४१ राजदूत माघारी बोलावले, पण तोरा कायम

यापुढे दर १५ मिनिटांनी ही ट्रेन उपलब्ध होणार असून पुढच्या स्थानकांचा विस्तार झाल्यांनतर दर ५ मिनिटांच्या अंतराने ट्रेन धावणार आहेत. ताशी १६० किमीच्या वेगाने ही ट्रेन धावणार असून १८० किमी पर्यंत वेग मर्यादा आहे.

कोणत्या सुविधा असतील

मेट्रोप्रमानेच रॅपिड ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित असणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, लॅपटॉप, मोबाईल चार्जिंगची सोय डायनामिक रूम मॅपसारख्या अनेक सुविधा असणार आहेत.

Namo Bharat Rapid Train
Mahadev Jankar News: महाविकास आघाडीमध्ये रासपची एन्ट्री होणार का? शरद पवारांचा उल्लेख करत महादेव जानकर म्हणाले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com