Mahadev Jankar News: महाविकास आघाडीमध्ये रासपची एन्ट्री होणार का? शरद पवारांचा उल्लेख करत महादेव जानकर म्हणाले?

Mahadev Jankar News: 'माझी आणि शरद पवारांची कुठलीही भेट झाली नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिलं आहे.
Mahadev Jankar News
Mahadev Jankar NewsSaam tv
Published On

प्रमोद जगताप

Mahadev jankar News:

महायुतीसोबत असलेला राष्ट्रीय समाज पक्ष हा महाविकास आघाडीसोबत येण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यासाठी महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, महादेव जानकरांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. 'माझी आणि शरद पवारांची कुठलीही भेट झाली नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिलं आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट झाल्याचं वृत्त हाती आलं होतं. जानकरांनी दिल्लीत काही दिवसांपूर्वी ही भेट घेतल्याची माहिती आहे. महादेव जानकर आणि शरद पवार यांच्या कथित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahadev Jankar News
Lalit Patil Case: ललित पाटीलला 'ससून'मधून पळून जाण्यास मदत करणाऱ्या मैत्रिणी आहेत तरी कोण?

या कथित भेटीवर प्रतिक्रिया देताना महादेव जानकर म्हणाले, 'माझी आणि शरद पवारांची आज भेट झाली नाही. गेल्या महिन्यात विमानतळावर भेट झाली होती. मात्र, तिथं कुठलीही राजकीय चर्चा झाली नव्हती. त्यावेळी इतरही काही व्हिआयपी लोक उपस्थित होते. माझा पक्ष देशभर जनस्वराज्य यात्रा काढत आहे. तशी आमची चर्चा सुरू आहे'.

Mahadev Jankar News
Jharkhand Ramleela News: दुर्दैवी! रामलीलामध्ये भगवान परशुरामाची भूमिका साकारताना मृत्यूने कवटाळलं; कलाकाराच्या निधनाने परिसरात हळहळ

'मी सध्या कुठल्याही आघाडीचा भाग नाही. मला इंडियाकडून कोणत्याही प्रकारचं निमंत्रण नाही. आमचा पक्ष राजस्थान, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात निवडणुका लढणार आहे. मी बारामतीसह इतर ४ मतदार संघाचं लोकसभेचं तिकीट पार्लमेंट्री बोर्डाकडे मागितलं आहे, असे जानकर पुढे म्हणाले.

Mahadev Jankar News
CCTV Footage : बेदर'कार'! भरधाव कारने फुटपाथवरुन चालणाऱ्या नागरिकांना चिरडलं; एकाचा मृत्यू, ४ जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com