खलिस्तानी समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर आरोप करणारा कॅनडा अखेर भारतासमोर नरमला आहे. भारताच्या अल्टिमेटमनंतर कॅनडाने आपले ४१ राजदूत माघारी बोलावले आहेत. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्लानी जोली यांनी गुरुवारी ही घोषणा केली.
निज्जरच्या हत्येच्या घटनेनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले होते. त्यानंतर भारत आणि कॅनडा या दोन देशांतील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर भारताने कॅनडाच्या राजदूतांना देश सोडण्यास सांगितले होते. भारताने 'नाक दाबल्यानंतर' कॅनडाने नरमाईची भूमिका घेत ४१ राजदूतांना माघारी बोलावले आहे. त्यांची सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्लानी जोली यांनी दिले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंच्या आरोपांनंतर भारत आणि कॅनडामधील संबंधांमध्ये मिठाचा खडा पडला. त्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत कॅनडाच्या ४१ राजदूतांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले. सरकारने त्यांना १० ऑक्टोबरपर्यंतचा वेळ दिला होता. अखेर कॅनडाने नरमाईची भूमिका घेतली असून, ४१ राजदूतांना भारतातून हटवल्याची घोषणा परराष्ट्र मंत्री जोली यांनी केली.
भारतासोबतचे संबंध ताणले गेल्यानंतर कॅनडाने आपल्या ४१ राजदूतांना माघारी बोलावले आहे. मात्र, कॅनडाने चंदीगड, मुंबई आणि कर्नाटकातील कॉन्सुलेट सेवा बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यांच्या परराष्ट्र मंत्री जोली यांनी ही माहिती दिली. (India-Canada dispute)
सुरक्षेला धोका असल्याच्या कारणास्तव राजदूतांना भारतातून माघारी बोलावले आहे. त्यामुळे दोन देशांतील वाणिज्य दूतावासांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होईल. दुर्दैवाने आम्हाला चंदीगड, मुंबई आणि बंगळुरूतील कॉन्सुलेटमधील सर्व सेवांवर बंदी आणावी लागली आहे, असेही त्या म्हणाल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.