प्रमोद जगताप, प्रतिनिधी
कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी प्रकरणावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. एका परदेशी वृत्तपत्राचा दाखला देत उद्योगपती गौतम अदानी यांनी कोळशाची किंंमत चुकीच्या पद्धतीने दाखवून आणि खोटी बिले दाखवून वीजदरात वाढ केल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला.
काय म्हणाले राहुल गांधी?
कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत उद्योगपती गौतम अदानींवर गंभीर आरोप केले. "गरीब लोक पंखा चालवतात किंवा बल्ब लावतात तेव्हा पैसे थेट अदानींच्या खिशात जातात. गौतम अदांनींना (Gautam Adani) भारताचे पंतप्रधान संरक्षण देत आहेत, अशी टीकाही राहुल गांधी यांनी यावेळी केली.
तसेच विदेशी वृत्तपत्र फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्ताचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले की, "हे थेट वीजचोरीचे प्रकरण आहे. भारत सरकार त्यांची कोणतीही चौकशी करू शकत नाही, कोणतेही प्रश्न विचारू शकत नाही. यामागे कोणती शक्ती आहे हे संपूर्ण देशाला माहीत आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
देशाचे पंतप्रधान शरद पवार नाहीत....
पत्रकार परिषदेतच राहुल गांधींना INDIA आघाडीचा विरोध असतानाही त्यांची भेट घेणाऱ्या शरद पवारांना हा प्रश्न का विचारला नाही, असा सवाल करण्यात आला. यावर राहुल गांधी यांनी "मी आजवर शरद पवारांना (Sharad Pawar) एकही प्रश्न विचारला नाही. त्यामागचे कारण म्हणजे शरद पवार पंतप्रधान नाहीत, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंतप्रधान आहेत, अदांनींना शरद पवार नाही, तर मोदी वाचवत आहेत, असे उत्तर त्यांनी दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.