Israel Hamas War: अमेरिका गाझा आणि वेस्ट बँकसाठी 100 मिलियन डॉलर्सची मदत देईल, जो बायडेन यांची घोषणा

America President Joe Biden News: अमेरिका गाझा आणि वेस्ट बँकसाठी 100 मिलियन डॉलर्सची मदत देईल, जो बायडेन यांची घोषणा
America President Joe Biden
America President Joe BidenSaam TV
Published On

Joe Biden Announced $100 million for Gaza and West Bank:

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात ४ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर लाखो जखमी आहेत. इस्रायलने हमासची अनेक क्षेत्रे उद्ध्वस्त केली आहे. अशातच आता हमासही आक्रमक झाला आहे.

मंगळवारी गाझा रुग्णालयावरील हल्ल्यात ५०० जणांना जीव गमवावा लागला. याच्या एका दिवसानंतर बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मोठी घोषणा केली.

America President Joe Biden
Amazon Sale: 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी; 6 हजारांनी स्वस्त झाला Samsung चा हा 5G फोन

गाझा आणि वेस्ट बँकमध्ये मानवतावादी मदतीसाठी त्यांनी 100 मिलियन डॉलर्सची घोषणा केली आहे. याबाबत बायडेन यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, “मी गाझा आणि वेस्ट बँकमधील मानवतावादी मदतीसाठी 100 मिलियनअमेरिकन डॉलर (सुमारे 832 कोटी रुपये) देण्याची घोषणा केली आहे. यामुळे10 लाखांहून अधिक विस्थापित आणि संघर्षग्रस्त पॅलेस्टिनींना मदत मिळेल.'' ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे यासाठी एक यंत्रणा असेल, जेणेकरून ही मदत हमास किंवा दहशतवादी गटांना नाही, तर गरजूंपर्यंत पोहोचेल. (Latest Marathi News)

बायडेन इस्रायलला पोहोचले असून त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली आहे. मदतीची घोषणा केल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आणखी दोन ट्वीट केले. यामध्ये त्यांनी हमासवर जोरदार हल्ला चढवला आहे.

America President Joe Biden
Khichdi Scam: BMC अधिकारी आणि ठाकरे गटातील नेत्याच्या ठिकाणांवर ईडीची छापेमारी

'हमास पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही'

त्यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ''हमास बहुसंख्य पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही. इस्रायली लोकांच्या धैर्य, वचनबद्धता आणि शौर्याचा सन्मान करण्यासाठी मला इस्रायलमध्ये असल्याचा अभिमान आहे. गेल्या आठवड्यातील दहशतवादी हल्ल्यांनंतर अमेरिकन लोक तुमच्यासोबत शोक करत आहेत. गाझा हल्ल्याप्रकरणी आणखी एका पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेचे इस्लामिक जिहादचे नाव समोर आले आहे. असे बोलले जात आहे की, तो इस्रायलवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याचे मिसाईल चुकले आणि ते हॉस्पिटलवर पडले. यामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com