Khichdi Scam: BMC अधिकारी आणि ठाकरे गटातील नेत्याच्या ठिकाणांवर ईडीची छापेमारी

Khichdi Scam: ईडीने कोविड-१९ खिचडी घोटाळा प्रकरणी छापेमारी केली.
Khichdi Scam
Khichdi ScamSaam
Published On

Khichdi Scam:

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज ६.७ कोटी रुपयांच्या कोविड-१९ खिचडी घोटाळा प्रकरणी छापेमारी केली. ईडीने ठाकरे गटातील नेत्यांशी संबंधित ठिकाणांवर छापे मारले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापालिका आयुक्त संगीता हसनाळे, शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते सूरज चव्हाण आणि ५ खासगी कंत्राटदारांच्या परिसरासह ७ ठिकाणी छापे टाकले. (Latest News)

काय आहे खिचडी घोटाळा?

कोरोना काळात काही नेत्यांनी स्थलांतरित मजुरांना खिचडी पॅकेट पुरवण्याचे कोट्यवधींचे कंत्राट मुंबई महापालिकेकडून घेतले होते. लॉकडाऊन काळात मुंबईतील स्थलांतरित मजुरांना २५ खिचडी पॅकेट पुरवण्यात आले होते. यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा (EOW )या प्रकरणाचा तपास करत आहे. त्या पार्श्वभूमीवर ईडीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यानुसार अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल नोंदवण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांच्या खिचडी घोटाळ्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुजित पाटकर हे सध्या कोविड-19 जंबो सेंटर्स घोटाळ्याच्या चौकशीचा एक भाग म्हणून न्यायालयीन कोठडीत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्याला या वर्षी जुलैमध्ये ईडीने अटक केली होती. सुजित पाटकर हे सध्या कोविड- १९ जंबो सेंटर्स घोटाळ्याच्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांना जुलैमध्ये ईडीने अटक केली होती. खिचडी घोटाळ्यात सुजित पाटकर यांनी सल्लागार सेवा देण्यासाठी सह्याद्री रिफ्रेशमेंट्सकडून ४५ लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

तसेच याशिवाय ठाकरे गटातील नेते गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांच्या खात्यावर ५३ लाख रुपये आणि सूरज चव्हाण यांच्या खात्यावर ३७ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. तर आर्थिक गुन्हे शाखेला संशय आहे की. या नेत्यांनी त्यांच्या राजकीय प्रभावाच्या मदतीने खासगी फर्मला खिचडी वितरणाचे कंत्राट मिळवून दिली होती. हसनाळे ह्या नियोजन विभागात होत्या. परंतु खासगी कंत्राटदार कंपन्यांची क्षमता न तपासता त्यांनी आरोपी फर्म कंत्राटदारांना कंत्राट दिले.

आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात पाटकर, सुनील उर्फ ​​बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्स वन मल्टी सर्व्हिसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा केटररचे भागीदार आणि इतर बीएमसी अधिकाऱ्यांना आरोपी म्हटलंय. यांच्यावर आयपीसी कलम ४२०, ४०९, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने लाइफलाइन मॅनेजमेंट सर्व्हिस - कोविड-१९ जंबो सेंटर्स घोटाळ्याप्रकरणी कदम आणि साळुंखे यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com