पिकनिकला गेलेल्या ६ मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. झारखंडच्या हजारीबाग जिह्यातील लोटवा धरणात मंगळवारी ही घटना घडली आहे. सर्वजण १२ वीच्या वर्गात शिकत होते. शाळा बंक करुन हे सर्व मित्र फिरायला गेले होते.
रजनीश पांडे, सुमित कुमार, मयंक सिंग, प्रवीण गोप, इशान सिंग आणि शिवसागर सिंग अशी मृतांची नावे आहेत. सर्वांचे वय १७ ते १८ वर्ष असल्याची माहिती मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणावर फिरायलेल्या गेलेल्या तरुणांना पोहण्याचा मोह आवरला नाही. सर्वात आधी दोन विद्यार्थी धरणात उतरले आणि थोड्याच वेळात बुडू लागले. हे पाहून इतर मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी धरणात उड्या मारल्या. मात्र काही मिनिटातच सहा मित्र धरणात बुडाले, तर एकाला वाचवण्यात यश आले आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या दाव्यानुसार, विद्यार्थी मंगळवारी सकाळी गणवेशात घरातून बाहेर पडले. परंतु वर्गात न जाता सर्वजण धरणावर फिरायला गेले. त्या दिवशी वर्गात जवळापास १६-१७ जण अनुपस्थित होते. (Latest Marathi News)
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. हजारीबाग जिल्ह्यातील लोटवा धरणात सहा मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दु:खद बातमीने मन दुखावले आहे.दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.