Bhaubeej bone marrow donation saam tv
लाईफस्टाईल

Bhaubeej bone marrow donation: भाऊबिजेच्या निमित्ताने 11 वर्षांची बहीण ठरली ‘देवदूत’; बोनमॅरो दान करून भावाचं आयुष्य वाचवलं

11 year old girl saves brother: दिवाळीतील पवित्र सण भाऊबीज हा बहीण-भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक आहे. यावर्षी, भाऊबीजेच्या मुहूर्तावर मुंबईतील एका ११ वर्षांच्या बहिणीने आपल्या १५ वर्षीय भावाला बोन मॅरो दान करून त्याचा जीव वाचवलाय.

Surabhi Jayashree Jagdish

नुकत्याच साजऱ्या झालेल्या भाऊबीज नंतर भावंडांच्या प्रेमाचं सामर्थ्य दाखवणारा एक हृदयस्पर्शी प्रसंग समोर आला आहे. अवघ्या ११ वर्षांच्या मुलीने आपल्या १५ वर्षांच्या भावाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा बोन मॅरो दान करून त्याला नवजीवन दिलंय. ही घटना गिरगावच्या सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये घडली.

हा १५ वर्षीय मुलगा अक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया या रक्ताच्या कॅन्सरने ग्रस्त होता. सुरुवातीच्या उपचारांनंतर त्याची प्रकृती सुधारली होती. मात्र काही महिन्यांतच कॅन्सर पुन्हा अधिक तीव्र स्वरूपात परतला. या वेळी बोन मॅरो ट्रान्सप्लांट हाच त्याच्या जिवितासाठीचा एकमेव पर्याय होता.

फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याला सतत ताप येऊ लागला. औषधोपचार करूनही सुधारणा न झाल्याने रक्त तपासणी करण्यात आली आणि पांढऱ्या रक्तपेशींची संख्या असामान्यरीत्या वाढल्याचं दिसून आलं. त्यानंतर करण्यात आलेल्या बोन मॅरो चाचणीत ४५ टक्के पेशी कॅन्सरग्रस्त असल्याचं स्पष्ट झालं. परिस्थिती गंभीर असल्याने तातडीने केमोथेरपी सुरू करण्यात आली.

काही महिन्यांच्या तीव्र उपचारांनंतर त्याच्या शरीरात कॅन्सर पेशींचा मागमूस राहिला नव्हता आणि डॉक्टरांनी त्याला रिमिशन अवस्थेत मानलं. पण तीन महिन्यांतच कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं. या वेळी केमोथेरपी निष्फळ ठरली आणि ट्रान्सप्लांटची आवश्यकता निर्माण झाली. रुग्णालयातील तज्ज्ञांनी इम्युनोथेरपी औषधाचा वापर करून प्रारंभी स्थिती स्थिर केली. मात्र, अखेर बोन मॅरो ट्रान्सप्लांट आवश्यक ठरले.

डॉक्टरांनी सुसंगत दाता शोधण्यास सुरुवात केली आणि त्याची ११ वर्षांची बहिण पूर्णतः जेनिटिक मॅच असल्याचं आढळलं. तिने क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा बोन मॅरो दान करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी तिच्याकडून निरोगी स्टेम सेल्स काढून भावाच्या शरीरात प्रत्यारोपित केले. पुढील काही आठवडे निर्णायक ठरले. संसर्ग, ताप, एकांतवास अशा अडचणींना तोंड देत मुलाने अद्भुत मानसिक बळ दाखवले. काही आठवड्यांतच त्याच्या रक्तातील पेशी वाढू लागल्या आणि बोन मॅरोने शरीरात स्थिरपणा मिळवल्याचे स्पष्ट झाले.

सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमधील हेमॅटॉलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे संचालक डॉ. बालकृष्ण पडाते, यांनी सांगितलं की, “किशोरवयीन रुग्णांमधील अक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया हा अतिशय आक्रमक प्रकार असतो. अशा रुग्णांसाठी वेळेवर केलेला उपचार आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट हेच जीवन वाचवण्याचं एकमेव साधन असते. या मुलाने कठीण परिस्थितीत दाखवलेली जिद्द आणि सकारात्मकता खरोखर प्रेरणादायी आहे.

त्याच्या बहिणीने केलेले बोन मॅरो दान हे सुरक्षित आणि कमीतकमी आक्रमक पद्धतीने झालं असून तिच्या या निःस्वार्थ कृतीमुळे भावाला नवजीवन मिळालंय. प्रत्यारोपणानंतरचे १४० दिवस यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत आणि त्याचे आरोग्य आता स्थिर आहे. ही घटना वैद्यकीय विज्ञान, वेळेवर हस्तक्षेप आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने घडवलेले अद्भुत उदाहरण आहे,” असंही ते म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT