Parenting Tips : फास्ट फुडमध्ये काही हानिकारक तत्व असतात ज्याने लठ्ठपाना वाढतो. भूक कमी होते. सतत जर तुम्ही सतत फास्टफूडचे सेवन करत असाल तर, अधिक लट्टपाना वाढतो आणि त्याचबरोबर अनेक आजार सुद्धा आपल्याला जडतात.
पोळी भाजीला बघून प्रत्येक वेळेस तोंड बनवणारे मुले जुंकफुडचे नाव ऐकून अधिक आनंदी होतात. जंकफुड अधिक चविस्ट असते पण याचे सेवन जास्त प्रमाणात केले किंवा अधिक काळापर्यंत केले तर, व्यक्ती आजारी पडू शकतो.
चिकित्सक सांगतात की जंकफुड प्रेमी मुलांमध्ये (Children) पुढे जावून मधुमेह आणि उच्च रक्तदाब अश्या प्रकारच्या अराजांचा धोका उद्भवू शकतो. फास्ट फुडमध्ये काही हानिकारक तत्व असतात ज्याने लठ्ठपाना वाढतो. भूक कमी होते.
जास्त दिवस असे होत गेली तर अधिक लठ्ठपणा वाढतो आणि त्यात बरोबर काही आजाराच्या (Disease) सुद्धा आहारी जातात. अश्या मुलांच्या प्रतिरोधक क्षमतेवर नाही तर शारीरिक विकासावर घातक परिणाम होतो. आपण पुढे बघुया की गरजे पेक्षा जास्त जंग फुड खाल्याने लहान मुलांना होतात शरीराचे कोणते नुकसान.
डायबडीज -
जंकफुडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे कमी वयात डायबडीजचा धोका जास्त वाढतो .
थकवा आणि सुस्ती -
जंकफुड भुकेले पोट तर भरते पण, शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्त्व त्यातून मिळत नाही. जंकफुडमध्ये कार्बोहाइड्रेट, शूगर आणि फॅट असते त्याने वजन खूप वाढते. शरिरला ऊर्जा मिळते पण पोषन मिळत नाही. त्यामुळे शरीर सुस्त होते आणि थकवा जाणवतो.
लठ्ठपणा -
लहान मुले जंकफुड ग्रहण करतात तेव्हा त्यांचा लठ्ठपणा अधिक वाढू शकतो. जंकफुडमध्ये असलेल फॅट लठ्ठपणा वाढवतो आणि अनेक आजारांना आमंत्रण सुद्धा देतो.
डोके दुखीचा त्रास -
जंकफुड खाल्याने लहान मुलांमध्ये डोकेदुखीचा त्रास जास्त प्रमानात जाणवतो. जंकफुडमध्ये आढळून येणारा मोनोसोडियम ग्लूटामेट जास्त प्रमाणात उपयोग होतो. डोकेदुखी वाढवण्यापासून लहान मुलांच्या मानसीक संतूलनावर प्रभाव पडतो. काहीवेळेस लहान मुलं जंकफुड अधिक जास्त ग्रहण करतात तेव्हा चिडचिडे दिसून येतात तेव्हा डोकेदुखीचा त्रास सुद्धा दिसून येतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.