Child Care Tips : घराबाहेर पडताच मुलांना अनोळखी व्यक्तींची भिती का वाटते ? जाणून घ्या

Stranger Anxiety : अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लहान मुलं इतर दुसऱ्या व्यक्तीच्या कुशीत जाताच घाबरून रडायला लागतात.
Child Care Tips
Child Care TipsSaam Tv

Parenting Tips : लहान मुलांना अनोळखी लोकांची भिती वाटणं सामान्य गोष्टी आहे. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लहान मुलं इतर दुसऱ्या व्यक्तीच्या कुशीत जाताच घाबरून रडायला लागतात.

अशी भिती मुलांमध्ये 18 महिन्याचे होईपर्यंत असते. मात्र 18 महिन्यानंतरही जर मूल अनोळखी व्यक्तींना घाबरत असेल तर ही चिंतेची बाब असू शकते. याचे कारण म्हणजेच लहान मुलांमध्ये स्ट्रेंजर एंग्जायटी उपस्थिती आहे. त्यामुळे मुलांच्या लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला लहान मुलांमध्ये (Kids) स्ट्रेंजर एंग्जायटीबद्दलचा समस्या समजू शकाल. चला तर मग जाणून घेऊया लहान मुलांमध्ये स्ट्रेंजर एंग्जायटीची लक्षणे (Symptoms)

Child Care Tips
Kids Health Tips : लहान मुलांसाठी फिडींग स्पून खरेदी करण्यापूर्वी 'या' काही गोष्टी लक्षात ठेवा!

1. स्ट्रेंजर एंग्जायटी काय आहे ?

लहान मुले केवळ त्यांची काळजी (Care) घेणाऱ्या लोकांना ओळखतात आणि त्यांना सतत हे लोकांच्या आसपास असावे असे वाटते. आई-वडिलांबद्दल मुलांच्या मनात अशी प्रतिमा तयार झालेल्या असते. म्हणून अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर नवीन व्यक्ती आली की ते घाबरतात. स्ट्रेंजर ऐग्जाइअटिला डिस्ट्रेस बेबी एक प्रकार मानला जातो. ही समस्या लहान मुलांना अनोळखी व्यक्तीचा संपर्कात आल्यावर जाणवते.

2. लक्षणे

  • तुम्हाला या टीप्स लहान मुलांमध्ये स्ट्रेंजर एंग्जायटीची चिन्हे समजण्यास मदत करू शकतात

  • अनोळखी व्यक्ती किंवा पाहुणे घरी आल्यावर त्यांना पाहून घाबरणे किंवा रडणे.

  • अनोळखी लोकांसोबत मुले एकटे असताना घाबरतात.

  • जेव्हा स्ट्रेंजर एंग्जायटी असते तेव्हा मुले शांत होण्यासाठी जलद श्वास घेऊ लागतात.

  • तुम्हाला शोधण्यासाठी संपूर्ण घरातील (Home) प्रत्येक कोपरा पाहू लागतात.

  • अनोळखी लोकांना पाहिल्यानंतर लहान मुले लगेच कशासाठी कशाच्या तरी मागे लागतात तर हे त्यांच्यातीलस स्ट्रेंजर एंग्जायटीची लक्षण असू शकते.

Child Care Tips
Child Eye Care Tips : पालकांनो, वाढत्या वयात अशी घ्या मुलांच्या डोळ्यांची काळजी !

3. उपाय

  • मुलांमधील स्ट्रेंजर एंग्जायटी दूर करण्यासाठी नवीन व्यक्तीला मुलांची बोलू द्या. यामुळे मुलांच्या मनातील भीती कमी होईल.

  • नवीन व्यक्तींशी मुलांची ओळख करून देताना तुम्ही मुलांच्या जवळ राहा त्यामुळे त्यांना सुरक्षित वाटेल.

  • मुलांमधील स्ट्रेंजर एंग्जायटी सहज दूर होत नाही त्यामुळे तुम्हाला मुलाला थोडा वेळ द्यावा लागेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com