sodium effects on BP google
लाईफस्टाईल

High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी कोणतं मीठ आहारात वापरावं? जाणून घ्या मीठाचा शरीरावर होणारा परिणाम

Salt And Health: हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतं मीठ योग्य आहे? जाणून घ्या सोडियमचा शरीरावर परिणाम, डॉक्टरांचा सल्ला आणि मीठाबाबतचे गैरसमज.

Sakshi Sunil Jadhav

उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर हा आजच्या काळातला एक गंभीर आजार बनला आहे. बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीचा आहार यामुळे अनेकांना या समस्येला सामोरे जावं लागतं. यामध्ये रोजच्या आहारात वापरलं जाणारं मीठ (Salt) आणि त्यातलं सोडियम (Sodium) हे तुमच्या उच्च रक्तदाबावर थेट परिणाम करतं.

त्यामुळे हाय बीपी असलेल्या व्यक्तींनी रोजच्या आहारात कोणतं मीठ वापरलं पाहिजे? याबाबत अनेकदा संभ्रम असतो. पुढे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण याचं उत्तर जाणून घेणार आहोत.

बऱ्याच लोकांना वाटतं की, समुद्री मीठ, कोषेर मीठ किंवा हिमालयन पिंक सॉल्ट हे साध्या मिठापेक्षा जास्त फायदेशीर असतं. पण तज्ज्ञांच्या मते, मीठ कोणतंही असो, त्यातल्या सोडियमचं प्रमाण जवळपास सारखंच असतं. जास्त सोडियम शरीरात पाणी साठवतं, त्यामुळे रक्ताचं प्रमाण वाढतं आणि त्याचा थेट परिणाम रक्तदाब वाढण्यावर होतो. जास्त मीठ खाल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

टेबल सॉल्ट, समुद्री मीठ, कोषेर मीठ किंवा हिमालयन पिंक सॉल्ट यामध्ये फारसा आरोग्याच्या दृष्टीने फरक नसतो. फरक असतो तो फक्त चवीचा आणि कणांच्या आकारांचा. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांनी मीठाचा प्रकार बदलण्याऐवजी त्याचे प्रमाण कमी करणं जास्त महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांच्या मते, दिवसाला २३०० मिलीग्रॅमपेक्षा कमी सोडियम सेवन करणं आरोग्यासाठी योग्य ठरते.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी घरचं ताजं अन्न, कमी मीठ, कमी प्रक्रिया केलेले पदार्थ, हिरव्या भाज्या, फळं आणि पोटॅशियमयुक्त आहार घ्या. मसाले, औषधी वनस्पती, लिंबू, लसूण यांचा वापर करून चव वाढवता येते. काही लो-सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट पर्याय उपलब्ध असले तरी ते वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अखेर भरत गोगावलेंची एक इच्छा पूर्ण, मात्र पालकमंत्रिपदाचं स्वप्न अजूनही अपूर्ण

Maharashtra Live News Update: रायगडच्या पुनाडे घाटात पर्यटकांच्या वाहनाचा अपघात

शिंदेंचं नामोनिशाण मिटवण्याची भाषा, नाईकांनी पुन्हा शिंदेंना ललकारलं

शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, प्रकरण पोलिसांत पोहोचलं

अंबादास दानवेंचा ठाकरेसेनेला जय महाराष्ट्र?बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT