हिरवेगार डोंगर, गर्द झाडी अन् निळाशार समुद्र अशा निसर्गाचा आस्वाद घ्यायला कोणाला आवडत नाही. सर्वजण फिरायला जाण्यासाठी खूप जास्त उत्सुक असतात. थंडीचे दिवस सुरु झालेत. दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या काळात फिरायला जायला सर्वांनाच आवडते. मात्र, थंडीत फिरायला जायचे म्हटल्यावर अनेकजण घाबरतात. अनेकांना आजारी पडण्याची भिती असते.
थंडीत संपूर्ण कुटुंबासोबत फिरायला जायचे म्हटल्यावर अनेकांना टेन्शन येते. लहान मुले आजारी पडतील. थंडीमुळे त्यांना सर्दी खोकला होईल अशी अनेकांना भीती असते. परंतु भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे थंडीतदेखील ऊब जाणवते. थंडीत जर ऊबदार ठिकाणी फिरायला गेल्याची मज्जा काही वेगळीच असते. अशाच काही ठिकाणांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही थंडीत फिरायला जाऊ शकता.
कुर्ग, कर्नाटक
उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिणेकडील भागात हिवाळा कमी जाणवतो. कर्नाटकातील कुर्ग या ठिकाणी तुम्ही हिवाळ्यात फिरायला जाऊ शकता. हिरवी झाडी, दऱ्या आणि सहादरित झाडांनी वेधलेले आहेत. पर्यटकांसाठी फिरण्यासाठी ही खूप चांगली जागा आहे, येथे तुम्ही अॅबे फॉल्स, नामड्रोलिंग मठ, पुष्पगिरी अभयारण्य या ठिकाणी भेट देऊ शकता.
गोवा
हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी गोवा हा चांगला पर्याय आहे. समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य पर्यटकांना नेहमी आकर्षित करते. येथील वातावरण प्रर्यटकांना आवडेल. तेथील समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू, चर्च या ठिकाणी नक्की भेट द्या.
केरळ
भारतात केरळला स्वर्ग मानले जाते. येथील अनेक ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. पावसाळ्यानंतर केरळ खूप जास्त सुंदर असते. तेथील हिरवी झाडी, चहाचे मळे, हाऊस बोट साईड प्रेक्षकांना नेहमी आकर्षित करतात. केरळ हे फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
जोधपुर
राजस्थानमधील जोधपुर येथे तुम्ही फिरायला जाऊ शकता. येथील मेहरानगढ किल्ला, उम्मेद बवन पॅलेस आणि शांत महामंदिर येथे तुम्ही भेट देऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.