Fact Check : महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान? सरकारकडून महिलांना पिण्याची स्पेशल सोय?

Liquor Shop for Woman : महिलांसाठी आता स्वतंत्र दारू दुकान असणार आहे...होय, सरकार महिलांसाठी दारू दुकान उघडणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का... काय सत्य समोर आलं पाहुयात...
Liquor Shop for Woman
Liquor Shop for Womanx
Published On

Viral : सरकार आता महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान उघडणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल करण्यात आलाय...महिलांसाठी वेगळं दारू दुकान उघडलं जाणार हे ऐकूनच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय...पण, खरंच सरकारने असा निर्णय़ घेतलाय का...? महिलांसाठी वेगळं दारू दुकान उघडण्याचा निर्णय कशासाठी...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज - सरकार महिलांसाठी स्वतंत्र दारूची दुकाने उघडणार आहे. आधी लाडक्या बहिणीला पैसे देतात. नंतर ते तिला दारूच्या दुकानात बोलावतील आणि तेच पैसे परत घेतील.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने संभ्रम निर्माण झालाय...खरंच एकीकडे लाडकींना पैसे देऊन आता महिलांसाठी सरकार दारू दुकान उघडतंय का...? हा मेसेज वाचून अनेकांनी निषेध केलाय...मात्र, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती मिळवली...

त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

Liquor Shop for Woman
Viral Video : अभिनेत्याचं स्टेजवर अभिनेत्रीशी गैरवर्तन, थेट कमरेत घातला हात; सोशल मीडियावर होतंय ट्रोलिंग

व्हायरल सत्य - साम इन्व्हिस्टिगेशन

  • सरकार महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान उघडणार नाही

  • मध्य प्रदेश सरकारचा 2020 साली असा प्रस्ताव होता

  • यावेळी सरकारच्या निर्णयाचा जनतेने विरोध दर्शवला

  • सरकारने महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान उघडलेलं नाही

  • दारू दुकानाबाबतची बातमी व्हायरल करून दिशाभूल

Liquor Shop for Woman
Mumbai : मुंबईत भयंकर घडलं! सेना भवनासमोर वाहतूक पोलिसावर घातला ट्रक; Video

असे काही अर्धवट मेसेज व्हायरल केले जातात...मात्र, असे मेसेज पाठवल्याने संभ्रम निर्माण होतो...आम्ही याची सत्यता जाणून घेतली...त्यावेळी आमच्या पडताळणीत सरकार महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान उघडणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...तुम्ही अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका...

Liquor Shop for Woman
Crime : बंगल्यासाठी डान्सरकडून बीडच्या माजी उपसरपंचाचा घात? मृत्यूनंतर गर्लफ्रेंडचा Video समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com