Bus Accident: भीषण अपघात! भरधाव बसची टँकरला धडक, ५० फूट खोल दरीत बस पलटली, अनेकजण वाहनाखाली दबले

Uttar Pradesh bus-tanker crash: लखनऊमधील काकोरीजवळ एक भीषण अपघात झालाय. एका भरधाव वेगाने जाणारी बस एका टँकरला धडकली त्यानंतर ५० फूट खोल दरीत कोसळली. चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. मुख्यमंत्री योगी यांनी तातडीने बचाव कार्याचे आदेश दिले.
Uttar Pradesh bus-tanker crash
Lucknow Kakori accident: Roadways bus plunges into 50-foot gorge after hitting tanker; 4 dead, many injuredsaam tv
Published On
Summary
  • लखनौ-हरदोई रस्त्यावर काकोरी परिसरात बस-टँकर अपघात.

  • बस ५० फूट खोल दरीत पडून पलटी झाली.

  • अपघातात ४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी.

  • मुख्यमंत्री योगी यांनी तातडीच्या मदतकार्याचे आदेश दिले.

बस आणि टॅकरचा भीषण अपघात झालाय. टॅकरला धडक बसल्यानंतर बस ५० फूट खोल दरीत पलटी झाली. हा भीषण अपघात लखनौमधील काकोरीजवळ घडला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झालेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये गुरुवारी संध्याकाळी एक मोठा अपघात झाला. लखनऊ-हरदोई रस्त्यावरील काकोरीजवळ एका टँकरला बसची धडक झाली, त्यानंतर रोडवेज बस ५० फूट खोल दरीत पलटी झाली. (Lucknow Bus Accident: Bus Hits Tanker And Falls Into 50-foot Gorge, 4 Dead)

Uttar Pradesh bus-tanker crash
Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये 10 माओवाद्यांना कंठस्नान; चकमकीत 1 कोटीचं इनाम असलेला कमांडरचा खात्मा

या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक बसखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. मिळलेल्या माहितीनुसार बस हरदोईहून लखनऊला येत होती. काकोरीतील टिकैतगंजजवळ बसची एका टँकरला धडक झाली. वेगात असलेली बस नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या ५० फूट खोल खड्ड्यात पलटी झाली.

Uttar Pradesh bus-tanker crash
Accident : भीषण अपघात! ट्रक-टँकरची जोरदार धडक, टँकरखाली दबून सासू-जावयाचा दुर्दैवी अंत

अनेक दुचाकीस्वारांनाही बसने धडक दिली. बस उलटताच मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाला. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली आणि बचावकार्य सुरू करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळाताच पोलीस दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. बसखाली काही लोक अडकले असण्याची शक्यता असल्याने अग्निशमन दलालाही कळविण्यात आले आणि त्यांना पाचारण करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com