
MPSC : सध्या राज्यात आरक्षणासाठी जातीजातींमधला संघर्ष टोकाला गेलाय. सरकारी नोकरी आणि शिक्षणात सर्वांनाच आरक्षण हवंय. मराठ्यांना EWS मधून आरक्षण मिळालेलं असताना स्वतंत्र आरक्षणाची मागणी करण्यात आली. त्यासाठी SEBCमधून १० टक्के आरक्षण देण्यात आलं. मात्र मनोज जरांगेंनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आणि वाद चिघळला. कारण आरक्षणामुळे सरकारी नोकरी मिळण्याचा मार्ग सुकर होतो असा सर्वांचा समज आहे आणि त्यामुळेच सर्वांना आरक्षण हवंय....मात्र यंदाचा MPSCच्या मुख्य परीक्षेचा निकाल पाहिला तर अनेकांच्या भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय राहणार नाही. यात 1 हजार 516 विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र यावर्षी प्रत्येक प्रवर्गाचा कट ऑफ वाढलाय. कोणत्या गटाचा किती कट ऑफ आहे ते पाहूयात...
मराठा समाजाला स्वतंत्र SEBCमधून आरक्षण दिल्य़ामुळे आता EWSमधील मोठा घटक बाहेर पडला. त्यामुळे मागासलेल्या प्रवर्गांपेक्षा EWSचा कट ऑफ कमालीचा खाली आला. विशेष म्हणजे अनुसूचित जातीपेक्षाही EWSचा कट ऑफ कमी झालाय. तर SEBCपेक्षा OBC प्रवर्गाचा कट ऑफ पाच मार्कांनी कमी आहे. तर खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ दर वर्षी वाढत गेल्याचं समोर आलंय.
खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ
2019 - 459
2020 - 467
2021 - 477
2022 - 488
2023 - 475
2025 - 507
एकीकडे आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा समाजातली तेढ वाढत चाललीय. तर दुसरीकडे यंदाचा ओबीसी, एसईबीसी आणि EWSच्या आरक्षित प्रवर्गाचा कट ऑफ पाहिला तर जातीय आरक्षण फायद्याचं की तोट्याचं असा विचार करायला लावणारं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.