CRPF Recruitment 2023
CRPF Recruitment 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

CRPF Recruitment 2023 : 10 वी, 12 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुर्वंण संधी ! CRPF मध्ये 10 हजार पदांसाठी भरती

कोमल दामुद्रे

Sarkari Naukri : 10 वी, 12 वी उत्तीर्ण झालेल्या उम्मेदवरांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.

केंद्रीय राखीव पोलीस (Police) दलने कॉन्स्टेबल पदांच्या (CRPF भर्ती 2023) ड्रायव्हर (Driver) भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 27 मार्चपासून CRPF भरती 2023 साठी अर्ज करू शकतात. CRPF कॉन्स्टेबलची अंतिम तारीख 25 एप्रिल 2023 आहे.

10वी उत्तीर्ण उमेदवार CRPF कॉन्स्टेबलच्या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या भरती (CRPF भर्ती) प्रक्रियेअंतर्गत एकूण 9212 पदे भरली जातील. ज्या उमेदवारांना या पदांवर नोकरीसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी इतर गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

1. अंतिम तारीख

  • CRPF भारती साठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 27 मार्च

  • CRPF भारती साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 एप्रिल

2. रिक्त जागा

  • पुरुष - 9105 रिक्त जागा

  • महिला - 107 रिक्त जागा

  • एकूण पदांची संख्या - 9212

3. शैक्षणिक (Education) पात्रता

  • केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराकडे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे आणि भरतीच्या वेळी ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • सीटी/मेकॅनिक मोटार वाहन – मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मोटर मेकॅनिकमध्ये ०२ वर्षे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित ट्रेडमध्ये एक वर्षाचा अनुभव असावा.

  • (पायनियर विंग) सीटी (मेसन/ प्लंबर/ इलेक्ट्रिशियन) – मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

4. अर्ज कसा कराल ?

अर्ज करण्यासाठी crpf.gov.in वर जाणून तपासून शकता

5. किती असेल पगार ?

CRPF भारती 2023 अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना स्तर-3 द्वारे पगार म्हणून रुपये 21700 ते रुपये 69100/- दिले जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT