Central Government Jobs Vacancy: तरुणांसाठी खुशखबर ! केंद्रात 10 लाख पदे रिक्त, रेल्वेत सर्वाधिक संधी

Job Vacancy : केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ९.७९ लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत.
Government Jobs
Government JobsSaam Tv
Published On

Central Government Job : देशातील लाखो तरुण सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ९.७९ लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत.

आता शासनाकडून (Government) रिक्त पदांची माहिती आल्यानंतर मोठ्या प्रमाणात शासकीय पदे भरण्याची अपेक्षा आहे. सरकारने सर्व मंत्रालये/विभागांना रिक्त पदे भरण्यासाठी आधीच सूचना दिल्या आहेत. यावरील भरतीसाठी अधिसूचनाही लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे.

Government Jobs
Why Women Quit Their Job After Marriage : लग्नानंतर मुलींना का सोडावी लागते नोकरी ? कारणं आली समोर

1. सुमारे 10 लाख पदे रिक्त आहेत

केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती (Information) दिली आहे. त्यांनी सांगितले की भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये 9.79 लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमध्ये रेल्वेमध्ये सर्वाधिक पदांचा समावेश आहे. भारतीय रेल्वेमध्ये एकूण २.९३ लाख पदे रिक्त आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की 1 मार्च 2021 पर्यंत इतकी पदे रिक्त होती. ही रिक्त पदे भरण्याचे काम सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले.

2. या विभागांमध्ये पदे रिक्त आहेत

  • भारतीय रेल्वेनंतर (Railway) संरक्षण (नागरी) विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे रिक्त पदांची संख्या २.६४ लाख आहे.

  • गृह विभागात १.४३ लाख पदे रिक्त आहेत.

  • महसूल विभागात 80,243 पदे आहेत.

  • भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागात 25,934 पदे रिक्त आहेत.

  • अणुऊर्जा विभागात 9,460 जागा रिक्त आहेत.

Government Jobs
Bank Job : बँकेत 'या' पदासाठी आहेत 551 जागा रिक्त, आजच अर्ज करा

3. कशी असेल भरती प्रक्रिया

  • मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये अनेक पदांवर नियुक्त्या केल्या जात आहेत.

  • यासाठी केंद्र सरकारकडून रोजगार मेळावेही आयोजित केले जात आहेत.

  • सरकारने एका वर्षात 10 लाख रिक्त पदे भरण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

  • अशा परिस्थितीत येत्या वर्षभरात सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये भरती होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com