Why Women Quit Their Job After Marriage : लग्नानंतर मुलींना का सोडावी लागते नोकरी ? कारणं आली समोर

बऱ्याचदा असं होत की, मुलगी चांगल शिक्षण घेऊन लग्नाआधी देखील नोकरी करत असते.
Women Quit Their Job After Marriage
Women Quit Their Job After MarriagePinterest

Woman's Life After Marriage : लग्न करून सासरी जाणं हे प्रत्येक मुलीच्या नशिबात लिहिलेलं असत. पण बऱ्याच मुली नोकरी करत असतात. अशातच लग्न झाल्यावर नवरा आणि इतर घरातील माणसे नोकरी करण्यास नकार देतात. ते असं का करतात त्यांना अस करून नेमक काय भेटत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बऱ्याचदा असं होत की, मुलगी चांगल शिक्षण घेऊन लग्नाआधी देखील नोकरी करत असते. अशातच लग्न झाल्यावर सासरी तिला नोकरी करण्यास सक्त विरोध केला जातो. अशामुळे मुलींच्या आशा आकांक्षा धुळीला मिळून जातात.

Women Quit Their Job After Marriage
5 Signs Your Partner Is Marriage Material : तरुणांना लग्नासाठी कशी मुलगी हवी असते? मनात असतात बऱ्याच काही गोष्टी...

शिकलेली मुलगी सून म्हणून बऱ्याच लोकांना हवी असते. पण मुलाच्या घरचं सगळ चांगल असताना मुलीने नोकरी करण्यात स्वतःचा वेळ वाया घालवू नये आणि घराकडे लक्ष देऊन घर व्यवस्थीतपणे सांभाळावे अशी त्यांची अपेक्षा असते.

नोकरी करण्याऱ्या मुली घरकामामध्ये थोड्या कंटाळवाण्या असतात. असा त्यांचा समज असतो. घरातील जबाबदरीपासून मुलींना लांब होता येत नाही. अशातच करियर करणे फार लांबच राहून जातं. त्याचबरोबर मुलींनी सासरच्याचे न एकूण नोकरी केली तर त्यांच्या मनात एक प्रकारचा गिल्ट निर्माण होतो.

Women Quit Their Job After Marriage
Right Age to Get Married: लग्न करण्याचे योग्य वय कोणते?

नॅशनल फॅमिली (Family) हेल्थ सर्वेच्या म्हणन्यानुसार 32% लग्न झालेल्या बायकाचं नोकरी करत आहेत. एवढंच नाही तर 2004-05 आणि 2011-12 च्या दरम्यान एक आश्चर्यचकित बाब घडली होती. ती म्हणजे तब्बल 20 दशलक्ष भारतीय महिलांनी (Women) नोकरी सोडून दिली होती.

Marriage
Marriage canva

लग्न झाल्यावर मुलींना आपला नवरा आणि सासरच्या सगळ्या लोकांचं एकूण घ्यावं लागत. अशातच मुलींना सासरच्या मंडळींना आनंदी ठेवण्याचं प्रेशर असतं. मुलीने सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्टचं असलचं पाहिजे अशी अपेक्षा तिच्या सासरचे लोक करतात.

अशातच प्रत्येक मुलगी ही आयुष्याचा एक एक टप्पा चढत असते. लग्न झाल्यावर मुलगी सर्वात आधी तिच्या नवऱ्याची अर्धांगिनी म्हणून वावरते. बऱ्याचदा मुलींना सासरच्या लोकांच्या आनंदासाठी लवकरच आई व्हावं लागत. मुलांना सांभाळण्यात नवऱ्याकडे लक्ष द्यायला आणि सासू सासऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही.

Husband-wife
Husband-wife canva

त्यामुळे दोघांचेही बोलेने आणि टोमणे मुलीलाच एकूण घ्यावे लागतात. एक मुलगी होण कधीच सोपं नसत. आपला भारत देश जरी पुरुषप्रधान असला तरी, स्त्री ही स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यातील जिवनजननी आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की लग्नानंतर तुम्हाला नोकरी सोडावी लागेल, तर तुम्ही काही पद्धतींनी ही परिस्थिती येण्यापासून वाचवू शकता.

Women Quit Their Job After Marriage
Relation Tips: पुरूषानों, 'हे' चॉकलेट खा आणि लैंगिक क्षमता वाढवा!
  • स्वत: ला सपोर्ट व विकसित करा.

  • घरकाम (Home) करण्यासाठी मोलकरीण ठेवा.

  • मुलांची काळजी घेण्यासाठी आया असणे चुकीचे नाही.

  • दैनंदिन जीवनाचे नियोजन करा, जे काम आणि वैयक्तिक जीवन संतुलित करण्यास मदत करेल

  • तुमच्या पतीशी बोला आणि तितकीच जबाबदारी वाटून घ्या

  • आपल्या पालकांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com