BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

IPL Harshit Rana: केकेआरचा गोलंदाज हर्षित राणावर बीसीसीआयने एका सामन्याची बंदी घातलीय. क्रिकेट नियामक बोर्डाच्या या कारवाईवर राणाने टीका केलीय.
IPL Harshit Rana
IPL Harshit Rana

कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) टीका केलीय. क्रिकेट बोर्डावर नाराजी व्यक्त असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये केकेआरचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याशी तो बोलत असल्याचं दिसत आहे.

लखनऊ सुपरजायंट्सच्या विरुद्धात सामना खेळून परतत असताना एका चार्टर्ड प्लाइटमध्ये राणा आपल्या प्रशिक्षकाकाशी बोलत होता. दरम्यान हर्षित राणावर दोनदा कारवाई करण्यात आलीय. मात्र बीसीसीआयने केलेली कारवाई त्याला मान्य नसल्याचं त्याच्या बोलण्यावरून दिसत आहे.

का झाली कारवाई

केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना होत असताना आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल राणावर कारवाई करण्यात आली. राणाला त्याच्या मॅच फीच्या १०० टक्के रक्कम द्यावी लागणार असल्याचा दंड आकारण्यात आला. तर गेल्या मंगळवारी एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं होतं.

याआधीही राणावर कारवाई करण्यात आलीय. मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज मयंक अग्रवालला फ्लाइंग किस दिल्याबद्दल त्याच्या सामन्याच्या मानधनातून ६० टक्के रक्कम दंड म्हणून कपात करण्यात आलीय. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात राणाने अभिषेक पोरेलला बाद केल्यानंतर अशीच कृती केली होती. राणाने पोरेलकडे हातवारे करून पॅव्हेलियनमध्ये परत जावे असे सूचित केले होते. त्यानंतर प्लाइंग किस देऊ लागला होता.

लखनऊ सुपर जायंट्सवर ९८ धावांनी विजय मिळविल्यानंतर केकेआरचा संघ लखनऊहून कोलकाताकडे निघाला होता. परंतु प्रतिकूल हवामानामुळे त्यांना कोलकात्यात उतरण्यास अडचण आली. त्यामुळे त्यांचे विमान गुवाहाटीकडे वळवण्यात आले. यादम्यान नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी विमानात इंस्टाग्राम लाइव्ह सत्र आयोजित केले, यात राणा आणि पंडित यांच्यातील गप्पा देखील रेकॉर्ड झाल्या आणि त्या आता सोशल मीडियावर व्हायरलदेखील होत आहेत. या दोघेही १९ मे रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्सविरुद्धचा त्यांचा आगामी सामना खेळण्याच्या शक्यतेवर गमतीने चर्चा करत होते .

या चर्चेत राणा आपल्या प्रशिक्षक म्हणाला की, 'चला एक काम करू, सराव सत्र येथे ठेवूया, ." हा एक सत्र येथे करून घेऊ नंतर सामनाही खेळून घेऊ. जो शेवटचा आपला सामना आहे, असं राणा म्हणाला. त्यावर उत्तर देताना प्रशिक्षक पंडित म्हणाले १९ तारखेला सामना आहे. उद्या आणि परवा खेळून सर्व खेळ संपवून टाकू ना. म्हणजे आपल्याला परत १९ तारखेळा येण्याचं काम नसेल, असं राणाने पंडित यांच्या उत्तरला प्रतिक्रिया दिली.

त्यावर उत्तर देताना प्रशिक्षक पंडित म्हणाले '' आपला सामना १९ तारखेला आहे. मला पाहू दे मी काय करू शकतो ते. परंतु त्यासाठी बीसीसीआयशी चर्चा करावी लागेल. त्यावेळी बोलताना राणा म्हणाला की, 'बीसीसीआयशी तर सोबत चर्चा करुच नका'.

IPL Harshit Rana
LSG Playoffs Scenario: KKR विरुद्धच्या पराभवानंतर लखनऊचं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये जाण्यासाठी करावं लागेल हे काम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com