दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात एकाक्षणी राजस्थान रॉयल्स दिल्लीच्या हातातून सामना हिरावून घेईल असं वाटत होतं. मात्र कुलदीप यादवने एका षटकात दोन विकेट घेत बाजू पालटली आणि दिल्ली कॅपिटल्सने २० धावांनी सामना जिंकला. या विजयासह दिल्लीचे 12 गुण झाले असून चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपरजायंट्सची बरोबरी केली आहे. तर राजस्थानचा संघ १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानला हरवून दिल्लीने पाचवं स्थान पटकावलं आहे.
आयपीएल २०२४ च्या ५५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने आले होते. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना झाला. नाणेफेक जिंकत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीच्या फलंदाजांनी घरच्या मैदानात फटकेबाजी करत राजस्थानसमोर ८ विकेट गमावत २२२ धावांचं आव्हान ठेवलं होतं.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने 46 चेंडूत 86 धावांची खेळी केली. त्याने 6 षटकार आणि 8 चौकार ठोकले. मात्र, मुकेश कुमारने त्याची विकेट घेत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रियान परागने 27 आणि शुभम दुबेने 25 धावा केल्या मात्र राजस्थानला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. दुसरीकडे दिल्लीच्या 3 गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यात मदत केली. कुलदीप यादवने 4 षटकात केवळ 25 धावा देत 2 बळी घेतले. मुकेश कुमारने 30 धावांत 2 आणि अक्षर पटेलने 3 षटकांत 25 धावांत 1 बळी घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.