WPL 2024: एकटी दिप्ती ११ खेळाडूंवर पडली भारी! W,W,W ;शानदार गोलंदाजी करत संघाला मिळवून दिला विजय

Delhi Capitals vs UP Warriorz: वुमेन्स प्रीमियर लीगच्या १५ व्या सामन्यात यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
wpl 2024 deepti sharma bowling help to win up warriorz over delhi capitals in womens premier league
wpl 2024 deepti sharma bowling help to win up warriorz over delhi capitals in womens premier league twitter
Published On

WPL 2024, Delhi Capitals vs UP Warriorz Match Result:

वुमेन्स प्रीमियर लीगच्या १५ व्या सामन्यात यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या सामन्यात यूपी वॉरियर्सची स्टार खेळाडू दीप्ती शर्मा वन मॅन आर्मी ठरली. यूपी वॉरियर्स संघाने या सामन्यात १ धावेने विजय मिळवला.

१८ व्या सामन्यात पालटला सामना..

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ विजयाच्या अगदी जवळ होता. मात्र १८ व्या षटकात दीप्ती शर्माने एकाच षटकात सामन्याचं चित्र पालटलं. तिने या षटकात एका पाठोपाठ एक ३ फलंदाजांना माघारी धाडलं. या शानदार कामगिरीच्या बळावर दिल्लीचा संघ विजयापासून १ धावा दूर राहिला. या दमदार कामगिरीच्या बळावर दीप्ती शर्माला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

wpl 2024 deepti sharma bowling help to win up warriorz over delhi capitals in womens premier league
IND vs ENG 5th Test, Day 3: आर अश्विनच्या फिरकीवर इंग्लंडच्या फलंदाजांचा नागिन डान्स! लंचपर्यंत निम्मा संघ तंबूत

मेग लेनिंगची खेळी व्यर्थ..

दिल्लीकडून फलंदाजी करताना कर्णधार मेग लेनिंगने महत्वपूर्ण खेळी केली. लेनिंगने ४६ चेंडूंचा सामना करत १२ चौकारांच्या साहाय्याने ६० धावांची खेळी केली. तिने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. लेनिंगला सोडलं, तर इतर कुठल्याही फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील गाठता आलेली नाही. (Cricket news in marathi)

wpl 2024 deepti sharma bowling help to win up warriorz over delhi capitals in womens premier league
Sarfaraz Khan Shot: सरफराजचा मास्टर-ब्लास्टर स्टाईल बैठक शॉट! डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या शॉटचा Video एकदा पाहाच

वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने ५ पैकी ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आता यूपी वॉरियर्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाची विजयाची मालिका थांबवली आहे. तर गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या यूपी वॉरियर्स संघाने या सामन्यात दमदार कमबॅक केलं आहे. यूपी वॉरियर्स संघाने या स्पर्धेतील ७ पैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com