Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

Bhayandar News Update : सोसायटीचे फायर टेंडर न दिल्याने भाईंदर पश्चिम येथील राई गावातील सोसायटीच्या खजिनदाराला उग्निशमनच्या अधिकाऱ्यांने मारहाण मारहाण केली आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
Bhayandar News
Bhayandar NewsSaam Digital

सोसायटीचे फायर टेंडर न दिल्याने भाईंदर पश्चिम येथील राई गावातील सोसायटीच्या खजिनदाराला उग्निशमनच्या अधिकाऱ्यांने मारहाण मारहाण केली आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटनेची सर्व घटना सीसीटीवीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सदानंद पाटील या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित सोसायचीच्या खजिनदाराने सोसायटीच्या आगीचे टेंडर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याला दिलं नव्हतं. त्यामुळे 1 मे रोजी हळदीच्या कार्यक्रमात जेवत असताना सदानंद पाटील यांनी त्यांना मारहाण केली. पाटील याने दारूच्या नशेत मांजरेकर यांना एवढी बेदम मारहाण केली की त्यांचा पायला दोन ठिकाणी गंभीर जखम झाली आहे. जखमी मांजरेकर यांच्यावर भाईंदर येथील ऑर्थोमेड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी आरोपीवर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध कलम ३२५,५०६,५०४ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Bhayandar News
Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री

नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न फसला

नकली नोटा चलनात आणणाचा दिल्लीतील एका युवकाला प्रयत्न फसला आहे. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे. अंकुश सिंह असं युवकाचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 13 हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत, अशी माहिती महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली. 

Bhayandar News
Kalyan Crime News: नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न फसला, दिल्लीतील युवकाला कल्याणमध्ये अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com