Kalyan Crime News: नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न फसला, दिल्लीतील युवकाला कल्याणमध्ये अटक

Kalyan Latest Marathi News : या प्रकरणाचा तपास कल्याणचे डिसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेश साळवी यांच्या नेतृत्वात सुरु झाला.
kalyan mahatma phule police arrested youth along with 13 thousand fake currency
kalyan mahatma phule police arrested youth along with 13 thousand fake currencySaam Digital
Published On

- अभिजित देशमुख

नकली नोटा चलनात आणणाऱ्या दिल्लीमधील एका युवकाला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. अंकुश सिंह असे युवकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 13 हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत अशी माहिती महात्मा फुले पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली. (Maharashtra News)

कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील बाजारपेठ एक तरुण शंभर दोनशे रुपयांमध्ये काही वस्तू खरेदी करीत आहे. परंतू तो ज्या नोट्या देत आहे. त्या नोटा नकली असल्याचा संशय एका फळ विक्रेत्याला आला. त्याने याची माहिती त्याच्या मित्राला दिली. मित्राने ही माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या पोलिसांना दिली.

kalyan mahatma phule police arrested youth along with 13 thousand fake currency
Maharashtra Election 2024: सातारा लाेकसभा मतदारसंघात पैसे वाटप झाल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, Video

या गाेष्टींचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ स्टेशन परिसरात त्या व्यक्तीचा शोध सुरु केला. अवघ्या २० मिनिटात पाेलिसांनी युवकाला ताब्यात घेतले. यावेळी ताे दिल्लीचा राहणारा असल्याचे पाेलिसांना समजले. दिल्लीत तो रॅपिडो बाईक चालविताे. कल्याणमध्ये त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी आला होता.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 13 हजार रुपयांची रोकड सापडली. धक्कादायक म्हणजे त्याच्याकडे सापडलेल्या सर्व नोटा नकली होत्या. या प्रकरणाचा तपास कल्याणचे डिसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेश साळवी यांच्या नेतृत्वात सुरु झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंकुश सिंह याला या नोटा चालविण्यासाठी दिल्लीतील एका व्यक्तीने दिल्या होत्या. या नोटा त्याने चालविल्यास त्याला पुढेही काम दिले जाईल असे समोरच्या व्यक्तीने सांगितले. समोरच्या व्यक्तीच्या शोधासाठी पोलिस पथक दिल्लीला रवाना झाले आहे अशी माहिती गुंजाळ यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

kalyan mahatma phule police arrested youth along with 13 thousand fake currency
Kolhapur Constituency : 'लोकांमध्ये मिसळणे आमच्यासाठी नवीन नाही', मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शाहू महाराज छत्रपतींच्या नातीने स्पष्टच सांगितलं, Video

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com