Kolhapur Constituency : 'लोकांमध्ये मिसळणे आमच्यासाठी नवीन नाही', मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शाहू महाराज छत्रपतींच्या नातीने स्पष्टच सांगितलं, Video

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराच्या ताेफा थंडावल्यानंतर आज काेल्हापूर येथे प्रत्यक्ष मतदानाची कार्यवाही सुरु झालेली आहे. लाेकप्रतिनिधींसह सामान्य नागरिक मतदान करीत आहेत.
yashaswini raje grand daughter of shahu maharaj chhatrapati cast vote in kolhapur lok sabha constituency
yashaswini raje grand daughter of shahu maharaj chhatrapati cast vote in kolhapur lok sabha constituency Saam Digital

- रणजीत माजगावकर

काेल्हापूर लाेकसभा मतदारसंघात (kolhapur lok sabha constituency) मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. या मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत सरारी 25 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांची नात यशस्विनी राजे यांनी थेट अमेरिकेहून येत आपला मतदानाचा हक्क बजावला. लाेकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही यशस्विनी राजेंनी साम टीव्हीशी बाेलताना काेल्हापूरकरांना आवाहन केले. (Maharashtra News)

कोल्हापूर लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्यात प्रमुख लढत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराच्या ताेफा थंडावल्यानंतर आज काेल्हापूर येथे प्रत्यक्ष मतदानाची कार्यवाही सुरु झालेली आहे. लाेकप्रतिनिधींसह सामान्य नागरिक देखील मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसत आहे.

शाहू महाराज यांची नात आणि युवराज मालोजी राजे यांची कन्या यशस्विनी राजे या थेट अमेरिकाहून कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. आजोबांसोबत त्यांनी प्रचार तर केलेलाच आहे. पण त्यांनी आज मतदान करत आपल्या मतदानाचा हक्क ही बजावलेला आहे. त्यांचे लहान बंधू युवराज यशराज यांनी देखील आज पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी यशस्विनी राजे म्हणाल्या महाराजांना उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही सर्व जण त्यांचा प्रचार करण्यासाठी उत्सुक हाेताे. मला देखील सुटी मिळाल्याने मी महाराजांच्या प्रचारात सहभागी हाेऊ शकले त्याचा आनंद वाटताे. लाेकांच्या समस्या जाणून घेत त्या साेडविण्यासाठी आम्ही चर्चा करायचाे. लाेकांच्या भावना समजून घेतल्या असेही त्यांनी नमूद केले.

सातारा लाेकसभा मतदारसंघात अपशिंगे ग्रामस्थांचा मतदानावरील बहिष्कार मागे

धोम कालव्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील अपशिंगे येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला हाेता. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी सोमवारी दिले हाेते. दरम्यान प्रशासनाबराेबर चर्चा झाल्यानंतर ग्रामस्थांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेतल्याचे साम टीव्हीला सांगितलं. ज्या भागात ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला हाेताे तेथे आता बहिष्कार मागे घेतल्याने सुरळीत मतदान सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

yashaswini raje grand daughter of shahu maharaj chhatrapati cast vote in kolhapur lok sabha constituency
Beed Constituency: पंकजा मुंडे, बजरंग सोनवणेंना नोटीस, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 48 तासांमध्ये मागवला खुलासा; जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com