Best Treks Near Pune : पुणे तिथे काय उणे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पावसाळा हा निसर्ग अनुभवण्याचा ऋतू. या ऋतूमध्ये निसर्गाचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी आपण अनेक नवीन जागा शोधण्याच्या तयारीत असतो.
जसं जसा वीकेंड जवळ येतो तसं तसे आपण फिरण्याची ठिकाणे शोधत राहातो. कमी गर्दी असणारे ठिकाण पण सहज सोपी असं फिरायला कुठे मिळेल हा प्रश्न अनेकांना पडतो. ट्रेकर्स प्रेमींना ट्रेकिंगला जाण्यासाठी आपण मुंबई-पुण्यालगतची ठिकाणे पाहात असतात. पण पुण्यात अशी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत ज्याला तुम्ही भेट देऊन तुमच्या पावसाळ्यातली ट्रेकिंग मजेशीर बनवू शकता. जाणून घेऊया त्याबद्दल
1. राजमाची
पुण्यापासून ८२ किमी अंतरावर राजमाची किल्ला लोणावळ्याजवळ आहे. त्याचा जवळ असणारा शिरोटा धरण हे त्याच्या सौंदर्यात भर घालते. चढण्यासाठी अगदी सोपा आहे. अगदी ४० मिनिटांत सर करता येईल असा किल्ला (Fort). या किल्ल्यावर दोन गुफा आहेत जिथे ४० लोक एकत्र जाऊ शकतात. गडाच्या टोकावरुन निसर्ग दृश्य डोळे दिपवतात.
2. विसापूर
पुण्यापासून ७८ किमी अंतरावर विसापूर हा किल्ला लोहगडजवळ स्थित आहे. हे ठिकाण ट्रेकर्सप्रेमींसाठी (Trekking) आवडते आहे. चढण्यासाठी थोडा अवघड जरी असला तरी पावसाळ्यात येथील दृश्य मनमोहक दिसते. या डोंगराच्या माथ्यावर अनेक धबधबे आहेत. पाऊस पडल्यानंतर येथील धबधब्यांना (Waterfall) वेगळेच रुप प्राप्त होते. जलकुंभ असल्याने किल्ल्याची तटबंदी पुणे-मुंबई महामार्गाला आणखीनच प्रेक्षणीय बनवते.
3. हरिश्चंद्रगड
पुण्यापासून ११८ किमी अंतरावर हरिश्चंद्रगड हा डोंगरी किल्ला आहे. येथे पाच वेगवेगळ्या मार्गांनी टेकडीवर जाता येते. लांबचा प्रवास करुन या किल्ल्यावर चढणे थोडे कठीण आहे. येथे अनेक गुफा व कॅम्पिंग साइट्स देखील आहे. गोड्या पाण्याचे झरे खूप सुंदर दिसतात. कोकणकडा भेट देण्याबरोबरच येथील शिवमंदिरालाही भेट देता येते.
4. राजगड
पुण्यापासून ५० किमी अंतरावर असलेला राजगड. याची ओळख मराठा साम्राराज्याची पहिली राजधानी म्हणून होती. ट्रेकर्सप्रेमींसाठी हे सर्वात चांगले ठिकाण मानले जाते. पावसाळ्यात या ठिकाणी ट्रेकिंगला जाण्याची मज्जा काही औरच. येथे पाणीकुंड आणि बालेकिल्ला हे मुख्य आकर्षण मानले जातात. याशिवाय, गनपावडर स्टोअरच्या विविध वास्तू आणि मुख्य न्यायलय पाहता येते.
5. सिंहगड
पुण्यापासून ३५ किमी अंतरावर वसलेला सिंहगड पिकनिक स्पॉट्सपैकी एक आहे. ट्रेकर्स प्रेमींचा सगळ्यात आवडता असा हा किल्ला. येथे सुभेदार तानाजी मालुसरे व राजाराम महाराजांची स्मारके पाहायला मिळतात. याशिवाय देव टाकी नावाचा एक जलकुंभ आहे ज्यामध्ये वर्षभर शुद्ध पाणी असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.