Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : सुपारी फुटली लग्न ठरलं! मात्र पती पत्नी होण्याआधी एकमेकांना 'या' गोष्टी कधीच सांगू नका

Before Marriage Tips For All Couple : लग्न ठरल्यावर आपण पार्टनरला कोणत्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी लपवून ठेवल्या पाहिजेत याची माहिती जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

लग्न म्हणजे पती आणि पत्नी दोघांमधील एक अतूट नातं. हे नातं फक्त विश्वासावर घट्ट टिकून राहतं. सुरुवातीला प्रेमाच्या नात्यात दोघांना देखील सर्व काही छान वाटते. मात्र हळूहळू काही दिवस उलटून गेले की, एकमेकांचे स्वभाव आणि चांगल्या वाईट सर्व गोष्टी समोर येतात. त्यामुळे दोघांमध्ये देखील कडाक्याची भांडणे आणि वाद सुरू होतात. आता तुमचं देखील लग्न ठरलं असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स शोधल्या आहेत. या टिप्सने फॉलो केल्याने तुम्हाला सुखी आयुष्य जगता येईल.

पैसे

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात गरजे पुरते पैसे कमवतातच. बऱ्याच ठिकाणी मुलीच्या नातेवाईकांना लग्नाचा खर्च करावा लागतो. काही ठिकाणी मुलीच्या वडिलांनी सर्व खर्च करावा अशी प्रथा असते. काही वेळा खर्च करण्यावरून दोन्ही कुटुंबात वाद देखील होतात. त्यामुळे अशावेळी आपण किती श्रीमंत आहोत हे समोरच्या व्यक्तीला सांगू नका. पैशांवर जास्त बातचीत करू नका. कारण यामुळे समोरील व्यक्तीच्या अपेक्षा आहेत त्याहून जास्त वाढण्यास सुरुवात होते.

कुटुंबातील न आवडणारी व्यक्ती

कुटुंब म्हटलं की घरात भांडणं आणि मतभेद असणारच. असं एकही कुटुंब नाही जिथे व्यक्ती विविध कारणांवरून एकमेकांशी वाद करत नाहीत. त्यामुळे घरात वाद आणि भांडणे सुरु असतील तेव्हा आपल्या होणाऱ्या पार्टनरला या बद्दल माहिती देऊ नका. तुमच्या घरातील एखादी व्यक्ती किंवा त्यांचा स्वभाव तुम्हाला आवडत नसेल तरी देखील पार्टनरला याबद्दल काही माहिती देऊ नका. असे केल्याने पार्टनरच्या मनात देखील त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार सुरू होतात.

तुमचा विक पॉइंट

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टींना घाबर असतो. हा त्या व्यक्तीचा विक पॉइंट असतो. आपला विक पॉइंट काय आहे हे पार्टनरला लगेच समजू देऊ नका. कारण पार्टनर हे समजल्यावर तुमच्याशी कसे वागेल आणि कसे नाही याची आपल्याला माहिती नसते. जोपर्यंत तुम्ही पार्टनरला व्यवस्थित समजून घेत नाही तोवर त्याला तुमच्या विक पॉइंट बद्दल काहीही सांगू नका.

तुमचा पास्ट

लग्नाआधी प्रत्येक व्यक्तीला कोणी ना कोणी आवडतच असतं. तसेच बरेच जण रिलेशनमध्ये देखील असतात. काही कारणास्तव आपण त्या व्यक्तीची साथ सोडतो आणि पुढे निघतो. आपल्या आयुष्यात लग्नावेळी आपण पार्टनरला आपलं सर्वस्व मानतो. असे जरी असले तरी आपल्या पार्टनरबद्दल तुमच्या पती समोर किंवा पत्नी समोर कोणताही उल्लेख करू नका. याने नात्यातील दुरावा आणखी वाढण्याची शक्यता असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

SCROLL FOR NEXT