City Light And Heart Disease Link saam tv
लाईफस्टाईल

Street lights and health: रस्त्यांवरील दिव्यांचा प्रकाश घरात येतोय? स्ट्रीट लाइटमुळे हृदयाच्या समस्या वाढत असल्याचं संशोधनातून समोर

City Light And Heart Disease Link: आपल्या घरातील खिडकीतून येणारा स्ट्रीट लाइटचा प्रकाश आपल्याला शांत वाटू शकतो. पण, संशोधनातून असे समोर आले आहे की, रात्रीच्या वेळी घरात येणारा हा कृत्रिम प्रकाश तुमच्या आरोग्यासाठी (Health) खूप धोकादायक असू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • रात्रीचा प्रकाश हृदयविकाराचा धोका वाढवतो.

  • काळोखीत झोप हृदयासाठी फायदेशीर आहे.

  • प्रकाशामुळे सर्केडियन रिदम बिघडतो.

रात्री झोपताना तुम्हाला पडदे न लावता झोपण्याची सवय आहे का? त्यामुळे रस्त्यावरच्या दिव्यांची मंद प्रकाशझोत तुमच्या खोलीत येत असेल तर ती तुम्हाला सुखद आणि शांत वाटू शकते. पण ही सवय तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कारण जून 2025 मध्ये छापलेल्या एका अभ्यासात रात्रीच्या प्रकाशाचा आणि हृदयविकाराचा संबंध असल्याचं आढळून आलं आहे.

शरीराच्या इंटरनल क्लॉकवर परिणाम

या संशोधनात चांगल्या आणि सुदृढ झोपेसाठी काळोखाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. कारण गडद खोलीत मिळणारी झोप हृदयाचं आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करते. रात्री प्रकाशाच्या संपर्कात आल्याने शरीराचं जैविक घड्याळ (सर्केडियन रिदम) विस्कळीत होतं आणि त्यामुळे रक्तदाब, रक्तातील साखरेचं प्रमाण यांसारखे अनेक शारीरिक कार्यांवर वाईट परिणाम होतो.

आपलं शरीर नेहमी नैसर्गिक प्रकाशावर आधारित असतं, पण रात्री कृत्रिम प्रकाश जसं की, रस्त्यावरील दिवे, टीव्ही किंवा मोबाईल स्क्रीन यामुळे शरीराचा रिदम बिघडतो. संशोधनात हेही आढळलं की, सर्केडियन रिदम बिघडल्याने रक्तात गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढते. ज्याला हायपरकोअग्युलेबिलिटी म्हटलं जातं. हा बदल हृदयविकाराचा एक महत्त्वाचा धोका ठरू शकतो.

अभ्यास कसा झाला?

या अभ्यासात 88,905 प्रौढांचा समावेश करण्यात आला. त्यांनी एक आठवडाभर हातातील विशेष सेंसरच्या मदतीने रात्री प्रकाशाच्या संपर्काची नोंद ठेवली. त्यानंतर त्यांचा दहा वर्षांहून अधिक काळ अभ्यास करण्यात आला.

ज्या लोकांचा रात्रीच्या प्रकाशाशी सर्वाधिक संबंध होता त्यांच्यात कोरोनरी आर्टरी डिजीज, हार्ट अटॅक, हृदयाच्या समस्या, स्ट्रोक आणि आर्टियल फिब्रिलेशन यांचा धोका अधिक प्रमाणात आढळून आला. या अभ्यासात जीवनशैली आणि आनुवंशिक घटकांनाही लक्षात घेण्यात आलं.

नाइट लाइट आणि हृदयाचा संबंध

अभ्यासानुसार, हा संबंध म्हणजे थेट कारण-परिणाम नसला तरीही एक मजबूत नातं दाखवतो. विशेषतः महिलांमध्ये कोरोनरी आर्टरी डिजीज आणि हृदय अपयशाचा धोका जास्त दिसतो. तर तरुण वयोगटात आर्टियल फिब्रिलेशन आणि हृदयाची गती थांबण्याची शक्यता वाढते.

बचावासाठी काय कराल?

हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी काही साधे पण उपयुक्त उपाय करता येतात. झोपताना पडदे लावून खोली काळोखी ठेवावी, झोपायच्या आधी मोबाईल किंवा टीव्हीचा वापर टाळावा आणि खोलीतला दिवा किंवा लॅम्पची रोशनी बंद करावी किंवा शक्यतो कमी करावी. हे उपाय पाळल्याने तुम्हाला सखोल झोप मिळेल आणि हृदयही निरोगी राहील.

रात्रीचा प्रकाश हृदयावर कसा परिणाम करतो?

रात्रीचा प्रकाश सर्केडियन रिदम बिघडवून हृदयविकाराचा धोका वाढवतो.

सर्केडियन रिदम म्हणजे काय?

शरीराचे जैविक घड्याळ जे नैसर्गिक प्रकाशावर अवलंबून असते.

रात्रीच्या प्रकाशामुळे रक्तात काय समस्या निर्माण होऊ शकते?

रक्तात गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढते.

या अभ्यासात किती प्रौढांचा समावेश करण्यात आला?

८८,९०५ प्रौढांचा या अभ्यासात समावेश होता.

हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी झोपताना काय करावे?

खोली काळोखी ठेवून पडदे लावावेत आणि स्क्रीनचा वापर टाळावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: कोर्टाची आंदोलकांना २ दिवसांची मुदत, २ दिवसांत सर्व पूर्ववत करा- हायकोर्ट

महागडी नेल पॉलिश सुकली? 'अशा' पद्धतीने पुन्हा वापरू शकता

Reduce Eye Power: डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी योग्य आहार आणि घरगुती टिप्स

'आंदोलनाला परवानगी दिलीच कशी?' हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, कोर्टात नेमकं काय घडलं?

E-Scooter: ई-स्कूटर खरेदी करताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या, निवडताना काय तपासावे?

SCROLL FOR NEXT