Banana Tea Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Banana Tea Benefits : फक्त केळीच नाहीतर तिच्या चहाचे देखील आरोग्याला असंख्य फायदे, जाणून घ्या

तुम्ही आतापर्यंत केळीचा मिल्कशेक, किंवा आणखीन काही पदार्थांमधून केळीचा आस्वाद घेतला असेल. पण तुम्ही कधी केळीचा चहा प्यायला आहे का?

कोमल दामुद्रे

Banana Tea Benefits : आपण अनेक प्रकारची फळे खातो. सफरचंद, मोसंबी, पेरू, आंबा अशा प्रकारची फळे आपल्याल खूप आवडतात. अशातच केळी देखील अनेक लोकांना आवडते. केळी ही आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

तुम्ही आतापर्यंत केळीचा मिल्कशेक, किंवा आणखीन काही पदार्थांमधून केळीचा आस्वाद घेतला असेल. पण तुम्ही कधी केळीचा चहा प्यायला आहे का? केळीचा चहाच्या सेवनाने तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात.

केळी ही आपल्या शरीरासाठी गुणकारी असते. तसेच केळीचा चहा करून पिणे हे देखील आपल्या शरीरासाठी चांगले असते. केळीच्या चहामध्ये पोटेशियम, तांबे, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज यांसारखे पाण्यामध्ये मिसळून जाणारे तत्वे असतात.

हे आपली पचनसंस्था, हृदयापासून निगडीत आजार आणि इम्युनिटीवर चांगला परिणाम दर्शवतात. त्याचबरोबर मधुमेह रोग्यांना केळीच्या चहाचा अत्यंत फायदा होऊ शकतो. केळी चहासाठी स्ट्राँग एंटीऑक्सीडेंट पदार्थ नाही आहे. कारण की पाण्यामध्ये गेल्यावर केळी लगेच विरघळते. मधुमेह रोगी या केळीच्या चहाचं सेवन करू शकतात. या चहामध्ये साखर अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे मधुमेहांना याचा अजिबात त्रास होणार नाही.

कसा बनवाल ?

केळीचा चहा तुम्ही केळीची साल काढून किंवा सालीसकट देखील बनवू शकता. यासाठी एक केळी घ्या आणि तिला भांड्यामधे पाणी ओतून चांगल उकळवून घ्या. त्यानंतर दुध किंवा चहा सोबत तुम्ही केळीचे पेय पिऊ शकता. केळीच्या सालीसकट चहा बनवला तर त्याला सालीचा चहा म्हणतात. बरेच लोक केळीमधील असलेल्या हाय फायबर कन्टेन्टमुळे साल काढून टाकतात. त्याचबरोबर उरलेल्या केळीचा तुम्ही मिल्कशेक किंवा स्मुदी बनवून पिऊ शकता.

1. मधुमेह (Diabetes) नियंत्रणात

केळीच्या चहामुळे तुमचा मधुमेह आटोक्यात येऊ शकतो. मधुमेह रोगी गोड खाऊ शकत नाहीत. गोड खाल्ल्याने त्यांना लगेचच त्रास होतो. म्हणूनच केळीच्या चहाच्या सेवनाने मधुमेह रोग्यांच्या उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो.

2. वाढत्या वजनावर फायदेशीर (Benefits)

यामध्ये कैटेचीन सुद्धा असते. हे एक अँटिऑक्सिडेंट आहे जे हृदय रोगांपासून माणसाला दूर ठवते. यामध्ये आधिक प्रमाणत फायबर असल्यामुळे केळीची चहा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

Banana Tea Benefits

3. हाडे मजबूत राहातील

केळीचा चहा लवकर पचत नाही. तो दिर्घकाळ तुमचं पोट भरलेलं ठेवतो. त्याचबरोबर केळीच्या चहामुळे तुमची हाडे मजबूत बनतात. यामध्ये मॅग्नेशियम आणि मॅगनीज असल्यामुळे हाड मजबूत बनतात. त्याचबरोबर केळीचा चहा ऑस्टियोपोरॉसिसच्या आजारांपासून वाचवतो.

4. चांगली झोप

केळीच्या चहाच्या सेवनाने तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. त्यामुळे तुमचं नर्वस सिस्टम सुधारते आणि तुमचा मुड फ्रेश राहण्यास मदत होते. यामध्ये जास्त प्रमाणात डोपामाईन, ट्रिप्टोफॅन, आणि सेरोटनिन यांसारखे गुणधर्म असतात जे हृदयाच्या गतीला नियंत्रित ठेवतात.

5. डिप्रेशन

डिप्रेशनमध्ये असाल तर तुम्हाला केळीच्या चहाचं सेवन केलं पाहिजे. अशातच एका चहाचे अनेक फायदे जर तुम्हाला भेटत असतील. तर तुम्ही लवकरच केळीच्या चहाचं सेवन करण्यास सुरुवात करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Airport : सप्टेंबर अखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण! कोणत्या प्रवाशांना होणार थेट फायदा?

Nanded : नांदेडमध्ये ग्रामसभेत तुफान राडा, गावकऱ्यांनी एकमेकांना तुडवलं; चौघे जखमी | पाहा VIDEO

Navratri 2025: नवरात्रीतील ९ दिवसांसाठी देवीला कोणते नैवेद्य अर्पण करावे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: नागपुरात बंजारा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत पुन्हा नोंदणी सुरू होणार? सरकारकडे केली मागणी, काय निर्णय होणार?

SCROLL FOR NEXT