Diabetes : वाढलेली शुगर राहिल नियंत्रणात, आहारात समावेश करा 'या' 5 पिठांचा !

मधुमेही रुग्णांनी संतुलित आहार ठेवल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते.
Diabetes
DiabetesSaam Tv
Published On

Diabetes : बदलत्या जीवनशैलीत, योग्य आहार आणि नियमित व्यायामाच्या अभावामुळे बहुतेक लोक कोणत्या ना कोणत्या आजाराच्या विळख्यात आले आहेत. यापैकी एक म्हणजे मधुमेह. त्याच्या वाढीमुळे अनेक लोक चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्णांनी संतुलित आहार ठेवल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते.

नुकत्याच झालेल्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की या पाच धान्यांचे पीठ खाल्ल्यास साखरेची पातळी सामान्य होते. याचे कारण म्हणजे या पाच धान्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळणे. ते रक्तात जाऊन साखर सहज शोषून घेते. चला जाणून घेऊया ती 5 धान्ये आणि त्यांचे सेवन कसे करावे.

संशोधनानुसार, बाजरी, जव, ओट्स, ज्वारी आणि नाचणीच्या भरड धान्यापासून बनवलेले पीठ मिसळून खाणे मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. या धान्यांचे मिश्रण करून तुम्ही घरी साखरमुक्त पीठ तयार करू शकता. हे खाण्याचे अनेक फायदे (Benefits) आहेत.

Diabetes
Pregnancy Diabetes Chart : महिलांनो, गरोदरपणात रक्तातील शुगरचे प्रमाण किती असायला हवे ? जाणून घ्या

1. बाजरी

बाजरीत भरपूर फायबर (फायबर लेव्हल हाय) असते. हे सहसा हिवाळ्यात सेवन केले जाते. याचे कारण हे देखील आहे की त्याचा प्रभाव खूप गरम आहे. बाजरीची रोटी किंवा खिचडी खाल्ल्याने साखर पचण्यास खूप मदत होते.

2. नाचणी

नाचणी हे सुपरफूड आहे. हे ग्लूटेन मुक्त, कॅल्शियमचे प्रमाण जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट मुबलक प्रमाणात असते. हे हायपरग्लाइसेमिक आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव देखील कमी करते. अन्नामध्ये याचा समावेश केल्याने, फायबर साखरेचे चयापचय गतिमान करते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.

3. ज्वारी

ज्वारीमध्ये भरपूर फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात. ते ग्लूटेन मुक्त आहे. अन्नामध्ये त्याचा समावेश केल्याने रक्तातील साखरेची वाढ होत नाही.

Flour
Flourcanva

4. बार्ली

बार्लीमध्ये ग्लुकन बीटी असते. याची भरड खूप जाड आहे. त्याचे पीठ खाल्ल्याने साखरेची (Sugar) वाढ थांबण्यासोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

5. जव

जर तुम्ही जव ओट्स वाटून त्यांचा आहारात समावेश केला तर ते साखरेचे चयापचय वेगवान करू शकते. यातील मॅग्नेशियम आणि प्रथिने साखर लवकर पचण्यास मदत करतात. त्यामुळे साखर नियंत्रित राहते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com