Pregnancy Diabetes Chart : महिलांनो, गरोदरपणात रक्तातील शुगरचे प्रमाण किती असायला हवे ? जाणून घ्या

गर्भवती महिलेमध्ये अनेक शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होतात, तसेच आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.
Pregnancy diabetes Chart
Pregnancy diabetes ChartSaam Tv

Pregnancy Diabetes Chart : गर्भधारणेचा काळ प्रत्येक स्त्रीसाठी खास असतो. या काळात गर्भवती महिलेमध्ये अनेक शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होतात, तसेच आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.

या काळात महिलांना विशेष काळजी घ्यायला सांगितली जाते. तसेच महिलांना ताणतणाव घेतल्यास, आहाराची काळजी घेतली नाही, तर त्यांना गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोकाही होऊ शकतो. असे तज्ज्ञांचे मत आहे. गरोदरपणाच्या काळात महिलांची शुगर लेवल किती असायला हवी हे जाणून घेऊया.

Pregnancy diabetes Chart
Diabetes Side Effect In Pregnancy : बेबी प्लान करताना मधुमेंहीनी 'या' महिन्यात डॉक्टरांना का भेटावे ? जाणून घ्या

गर्भवती महिलांनी रक्तातील साखरेची (Sugar) पातळी 95-140 mg/dL राखली पाहिजे. निरोगी व्यक्तीमध्ये सामान्य रक्तातील साखरेची पातळी 90 ते 100 mg/dL दरम्यान असावी. पण कधी कधी ताणतणाव आणि चुकीच्या आहारामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी-जास्त होऊ शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त किंवा खूप कमी आरोग्यासाठी (Health) हानिकारक ठरू शकते.

काही महिलांना मधुमेह (Diabetes) होत नाही, परंतु त्यांना गर्भधारणेच्या काळात मधुमेहाचा आजार जडतो आणि गर्भधारणेनंतर हा आजारही संपतो. गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाला गर्भावस्थेतील मधुमेह म्हणतात. हा मधुमेह गर्भावस्थेच्या सहाव्या महिन्यापासून ते सातव्या महिन्यापर्यंत होऊ शकतो. हा आजार तोंडाद्वारे होणाऱ्या ग्लुकोज टॉलरंट चाचणीद्वारे शोधला जातो.

गरोदरपणात मधुमेहाचा आरोग्यावर कसा परिणाम होतो:

  • तज्ज्ञांच्या मते, गरोदरपणात होणारा मधुमेह केवळ आईच्या आरोग्यावरच परिणाम करत नाही तर मुलाच्या जीवालाही धोका निर्माण करतो.

  • गर्भधारणेदरम्यान गर्भावस्थेतील मधुमेहामुळे स्त्रीला भविष्यात टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका असतो.

Pregnancy diabetes Chart
Pregnancy diabetes ChartCanva

तज्ज्ञांच्या मते, गरोदरपणात रक्तातील साखर नियंत्रित न राहिल्यास आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याला हानी पोहोचू शकते. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की गरोदरपणात रक्तातील साखरेची पातळी किती असावी?

  • उपवासात रक्तातील साखरेची पातळी 92 mg/dl पेक्षा कमी असावी. जर ते जास्त असेल तर गर्भावस्थेतील मधुमेहाचे निदान करणे आवश्यक आहे.

  • एका तासानंतर साखरेची पातळी 180 mg/dl पर्यंत असावी, जर त्यापेक्षा जास्त असेल तर गर्भावस्थेच्या मधुमेहावर उपचार करणे आवश्यक आहे.

  • दोन तासांनंतर ग्लुकोजचे द्रावण 153 mg/dl पेक्षा जास्त असल्यास, गर्भावस्थेतील मधुमेहाचे निदान होईल.

या गोष्टी लक्षात ठेवा:

  • गरोदरपणात महिलांनी (Women) आपल्या आहाराची (Diet) काळजी घ्यावी. आहारात पोषक घटकांचा समावेश करा.

  • मसालेदार तेलकट पदार्थ टाळा. (Avoid spicy oily foods)

  • जेवणात मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करा. (reduce salt and sugar intake)

  • शरीर सक्रिय ठेवा. या वेळी सामान्य चालणे आणि हलका व्यायाम करणे देखील आवश्यक आहे.

  • तणावापासून (Stress) दूर राहा. तणावामुळे अनेक आजार होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com