Benefits of banana, Health issue  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Health Benefits Of Bananas: डाएट मध्ये केळी खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

nutritional facts about bananas: तुम्ही केळाचे सेवन तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा करु शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. हे फळ कोणत्याही महिन्यात बाजारात उपलब्ध होते. तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारायला केळ हे फळ खूप फायदेशीर आहे. तुम्ही केळाचे सेवन तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा करु शकता. त्याने तुम्हाला आश्यचर्यकारक फायदा कसा होईल हे जाणून घ्या.

दररोज आहारात डाएटसाठी केळीचे सेवन केल्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत.

केळीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, रक्तातील साखरेचे नियमन होते. तसेच केळींमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन नियंत्रणास मदत होते. समतोल आहाराचा भाग म्हणून केळी खाल्ली जातात. केळी हे एक पौष्टिक समृद्ध फळ आहे, जे दीर्घकालीन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते.

केळींमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्याचसोबत तुम्ही जेवणानंतर केळींचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते. तसेच जे मधूमेहाचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी हे फळ फायदेशीर आहे.

पचनासाठी फायदेशीर

केळीमधील आहारातील फायबर, प्रतिरोधक स्टार्च आणि पेक्टिन तुमच्या आतड्यांसंबंधी हालचालींना प्रोत्साहन देते. बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते आणि आतड्यांतील जीवाणूंना समर्थन देते.

वजन कमी करण्यास फायदेशीर

प्रत्यक्ष पुराव्यांचा अभाव असला तरी, केळी त्यांच्या कमी- कॅलरीमुळे तसेच उच्च पौष्टिक मूल्ये आणि पोट भरणारे फळ मानले जाते. मात्र केळींनी वजन कमी व्हायला सुद्धा मदत होत असते. केळीत भरपुर प्रमाणात स्टार्च असते. त्याने आपली भूक नियंत्रित होते. त्यामुळे आपण आहारात त्याचा समावेश करु शकतो.

पोषक तत्वांनी युक्त

केळींमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जसे की, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम. जे ऊर्जा उत्पादन यांसारख्या विविध शारीरिक कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे केळीचे सेवन हे शरीरासाठी आणि डाएटसाठी खूप फायदेशीर आहे.

Written by: Sakshi Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ऊस परिषदेत राजू शेट्टी यांचा कारखानदारांना इशारा: एफआरपीसह एक रकमी ३७०० रुपये पहिली उचल द्या

Chhagan Bhujbal: 'सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच', काका-पुतण्या संघर्षावर भुजबळांचा टोला

Sushant Shingh: सुशांत सिंग प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; सीबीआयला फटकारलं

Maharashtra Election: लाडक्या बहिणींचे भाऊ कोट्यवधी; कोणत्या नेत्याची किती संपत्ती? वाचा एका क्लिकवर

One Family One Job: एक कुटुंब एक नोकरी योजना, निरक्षरांना 25 हजार पगार; काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य? वाचा..

SCROLL FOR NEXT