Diwali Faral Recipes : लसूण शेव वाढवेल दिवाळीची रंगत, जाणून घ्या रेसिपी

spicy garlic sev recipe: काही मंडळी अशी असतात त्यांना फराळात काही तरी चटपटीत आणि तिखट हवे असते.
Diwali Faral Recipes
Diwali Faral Recipesyandex
Published On

दिवाळी म्हटलं की, फराळ येतं. दिवाळी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे सगळ्या गृहिणी आता लगबगीत दिसत आहेत. शॉपिंगसाठी म्हणा किंवा फराळासाठी त्यांची दिवाळी आधीचं ही कसरत सुरु होते. अशात फराळात शक्यतो सगळेच गोड पदार्थ तयार करतात. मात्र, काही मंडळी अशी असतात त्यांना फराळात काही तरी चटपटीत आणि तिखट हवे असते. अशाच तिखट फराळाची झटपट रेसिपी खास तुमच्यासाठी.

साहित्य

लसुण

पाव चमचा ओवा

पाव चमचा काळी मिरी

अर्धा चमचा हळद

अर्धा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर

३ चमचे तेल

पाव चमचा हिंग

चविनुसार मीठ

२ कप बेसन

पाणी

तेल

Diwali Faral Recipes
Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

लसुण शेव बनवण्याची कृती

सर्वप्रथम एक मिक्सरचे भांडे घ्या. त्यात लसूण पाकळ्या, ओवा, काळी मिरी, हळद आणि लाल तिखट एकत्र करुन घ्या. त्यात एक कप पाणी अॅड करुन मऊ पेस्ट तयार करुन घ्या. आता तयार मिश्रण एका परातीत काढा. यात बेसन मिक्स करुन पीठ मळून घ्या. त्यानंतर यात तेल, चिमूटभर हिंग आणि मीठ मिक्स करा. पुढे तुम्ही चकली बनवण्याच्या साच्यात शेवेचे पाते टाका आणि आतून या साच्याला तेल लावा. तयार मळलेले पीठ या साच्यात ठेवा.

आता तुम्ही गॅस ऑन करा. त्यावर कढई ठेवून तेल गरम करुन घ्या. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर साच्याच्या साहाय्याने शेव पाडायला घ्या. मध्यम आचेवर ही शेव सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्या. शेव आता एका कागदावर काढून घ्या. चला तयार झाली तुमची खमंग तिखट शेव तेही अगदी कमी वेळात. ही शेव तुम्ही हवा बंद डब्यात भरुन ठेवू शकता. त्याने शेव नरम होणार नाही.

Written by: Sakshi Jadhav

Diwali Faral Recipes
Diwali 2024: धनत्रयोदशीला बनवा खोबऱ्याच्या लाडूचा नैवेद्य; नोट करा सिंपल रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com