दिवाळी सण आता काही दिवसांवर आला आहे. आता प्रत्येक गृहिणी दिवाळीत कोण कोणते पदार्थ बनवायचे? या विचार असेलच. मात्र, सध्या लोकांच्या खाद्यपदार्थात काही बदल झाले आहेत. काही जण साखरेचे पदार्थ खाणे टाळतात. तर काही जण, तळलेले पदार्थ खाणे टाळतात. मग बनवायचं दिवाळीत नेमकं काय बनवायचं? याचा सगळ्यात मस्त उपाय आम्ही शोधला आहे. तुम्ही ओट्सचे साखर न वापरता लाडू तयार करु शकता.
साहित्य
१ वाटी ओट्स
१ वाटी खजूर
अर्धी वाटी बदाम
अर्धी वाटी काजू
२ टीस्पून जवसच्या बिया
१ टीस्पून चिया सिड्स
१ टीस्पून तूप
अर्धा टीस्पून वेलची पावडर
कृती
सर्वप्रथम एक नॉनस्टीकची कढई गॅस वर ठेवा. गॅस स्लो फ्लेमवर ठेवा. कढईत आता ओट्स टाका. ते व्यवस्थित भाजून घ्या. साधारण ३ ते ४ मिनिटांनी तुम्ही गॅस बंद करुन घ्या. आता भाजलेले ओट्स एका प्लेटमध्ये थंड करुन घ्या.
आता खजुर व्यवस्थित तुकडे करुन बारिक करुन घ्या. मग मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करा. आता पुन्हा नॉनस्टीकची कढई गॅस वर ठेवा. त्यात तुप टाका. आता कापलेले काजू बदाम , जवस आणि चिया सिड्स त्यात मिक्स करुन घ्या. दोन ते तीन मिनिटे हे पदार्थ तेलात परतुन घ्या.
आता कढईत खजुराची पेस्ट मिक्स करा. गॅस मध्यम आचेवरच असुद्या. हे मिश्रण एकत्र केल्यावर त्यात ओट्स आणि वेलची पूड मिक्स करा. ३ ते ४ मिनिटांनी गॅस बंद करा.
आता हे संपुर्ण मिश्रण एका प्लेट मध्ये काढून थोडे थंड करुन घ्या. मिश्रण थोडे कोमट झाल्यावर लाडु वळतो त्याप्रमाणे ते वळून घ्या. त्यांनतर १० मिनिटे लाडू सेट करायला ठेवा. चला तयार झाली खास लाडवांची रेसिपी.
Written By : Sakshi Jadhav