ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सणासुदीमध्ये गोड पदार्थांना फार महत्तव आहे.
रात्रीच्या जेवणानंतर काही लोकांना गोड पदार्थ खाण्याची इच्छा असते.
आज तुम्हाला घरच्या घरी झटपट तयार होणाऱ्या नारळाच्या वडीची रेसिपी सांगणार आहोत.
ओल्या खोबऱ्याचा कीस,साखर, दूध, साजूक तूप, बदामाचे काप
सर्व प्रथम एक पॅन घ्या. यानंतर गॅस ऑन करुन त्यावर पॅन ठेवा, मग त्यात साजूक तूप टाकून ओल्या नारळाचा किस टाकून या सर्व मिश्रणाला ५ मिनिटे चांगले परतून घ्या.
खोबऱ्याचा किस नीट परतून झाल्यावर त्यात दूध आणि साखर अॅड करा. यानंतर या सर्व मिश्रणाला चांगले मिक्स करुन घ्या.
सगळे काही अॅड केलेले मिश्रण १० मिनिटे परतून घ्या. हळूहळू या मिश्रणाचा गोळा तयार होऊ लागेल.
यानंतर गॅस बंद करा, आणि एक प्लेन ताट घेऊन त्याला तूप लावा. यानंतर त्यामध्ये सर्व मिश्रण टाकून हाताच्या साहाय्याने सपाट पसरवून घ्या.
पसरवले मिश्रणाला थोडावेळ सेट होऊन सुरीच्या साह्याने तुकडे करुन घ्या.
अशा प्रकारे आपली नारळाची वडी तयार झाली आहे. तुम्ही नारळाची वडीला बदामाच्या कापने सजवू शकता.
NEXT: क्रितीची एकूण संपत्ती किती