Biryani Reciepe Saam TV
लाईफस्टाईल

Biryani Reciepe : बकरी ईद स्पेशल बिर्याणी; 'या' पद्धतीने बनवाल तर सगळेच तुमच्या रेसिपीचे फॅन होतील

Ruchika Jadhav

बकरी ईद निमित्त अनेक घरांमध्ये स्वादिष्ट जेवण बनवलं जातं. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्तींना विविध आजार आणि व्याधी असतात. त्यामुळे काही व्यक्ती आहारात मांसाहार घेत नाहीत. मात्र ईद आणि बिर्याणी यांचं एक वेगळच नातं आहे. पण तुम्हाला देखील नॉनव्हेज बिर्याणी खायची नसेल तर आज आम्ही तुम्हाला अगदी नॉनव्हेजचा फील देणारी व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते सांगणार आहोत.

साहित्य

पनीर

सोयाबीन

कांदा

टोमॅटो

लसूण

अद्रक

गरम मसाला

खोबरं

शाही बिर्याणी मसाला

तांदूळ

पाणी

तेल

तूप

काजू

केसर

कृती

सर्वात आधी कांदे बारीक चुरून घ्या. चिरलेला कांदा तेलात छान गोल्डन ब्राऊन होपर्यंत तळून घ्या. त्यानंतर तेलात जिरे, तेजपत्ता, लवंग, दालचिनी असे सर्व खडे मसाले भाजून घ्या. यामध्ये सुक्क खोबरं देखील भाजून घ्या. त्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्या. याची अगदी बारीक पेस्ट बनवून घ्या.

त्यानंतर मिक्सरमध्ये अद्रक, लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून याची एक पेस्ट बनवून घ्या. आता दुसऱ्या एका गॅसवर तांदूळ बनवण्यासाठी ठेवा. त्यासाठी तांदूळ आधी स्वच्छ पाण्याने दोनवेळा धुवून घ्या. त्यानंतर एका पातेल्यात थोडे तूप टाका आणि त्यात 2 चमचे जिरे, एक तेजपत्ता, दालचिनीचा एक तुकडा टाकून घ्या.

नंतर यामध्ये धुतलेले तांदूळ मिक्स करा. चवीनुसार मीठ टाका. भात छान शिवजून घ्या. भात शिजवत असता तो अर्धा कच्चा राहील असा शिजवा. 2 वेळा उकळी आल्यावर त्यातील पाणी गाळून घा. आता पुढे एका बाउलमध्ये सोयाबीन भिजत ठेवा.

त्यानंतर एका पॅनमध्ये पनीरचे तुकडे आणि काजू तुपात भाजून घ्या. तसेच सोयाबीनचे तुकडे देखील भाजून घ्या. त्यानंतर दुसऱ्या भांड्यात तेल टाका. आणखी थोडा कांदा उभा चिरा आणि भाजून घ्या. त्यानंतर तयार मसाला यात टाका. या सर्व मसाल्याला छान तेल येऊ द्या.

त्यानंतर यामध्ये तांदूळ मिक्स करा. तसेच केसरचे पाणी आणि अन्य सर्व सामग्री यात मिक्स करा. छान थर लावून बिर्याणी दमण्यासाठी पुन्हा गॅसवर ठेवा. तयार झाली तुमची व्हेज दम बिर्याणी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi : संविधानात शिवरायांची विचारधारा! राहुल गांधींनी कोल्हापुरातून महाराष्ट्राला केलं मोठं आवाहन

Marathi News Live Updates : हिंदुत्वाच्या मुद्द्यानंतर आता नितेश राणे संविधानाच्या मुद्द्यावरही आक्रमक

Emotional Girls: या मुली असतात फारच हळव्या, जरा काही बोल्लं की लगेच रडतात

Amravati Accident: कॉलेजवरून घरी जाताना काळाचा घाला, दोन दुचाकींची समोरासमोर धडक, जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू

शरीरात अचानक 'हे' बदल दिसले तर समजा तुम्ही अति-प्रमाणात साखर खाताय

SCROLL FOR NEXT