How to maintain correct sitting posture at work SAAM TV
लाईफस्टाईल

Spine health tips: बसण्याची-उभं राहण्याची चुकीची पद्धत ठरते धोकादायक; दुखापत टाळण्यासाठी डॉक्टरांनी दिल्यात टीप्स

How to maintain correct sitting posture at work: चुकीच्या बसण्याच्या आणि उभं राहण्याच्या सवयींमुळे मणक्यावर ताण येतो. योग्य पोश्चर ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

तुम्ही बसताना, उभे राहताना किंवा मोबाईल वापरताना योग्य पोश्चर ठेवता का? वाकून बसणं किंवा तासन्‌तास चुकीच्या पद्धतीने बसणं ही सवय अनेकांना सामान्य वाटते. मात्र यामुळे मणक्याचं गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

चुकीच्या शारीरीक स्थितीमुळे मानेवर, खांद्यांवर आणि कंबरेवर अतिरिक्त प्रमाणात ताण येतो. त्यामुळे मणक्याचा नैसर्गिक स्थितीवर परिणाम होतो. सुरुवातीला किरकोळ वेदना जाणवतात, मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास पाठदुखी, मानदुखी, कडकपणा, नसा दाबल्या जाणं, हात-पाय सुन्न होणं आणि हालचालींमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.

डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलमधील अस्थिरोग तज्ञ आणि सांधे प्रत्यारोपण सर्जन डॉ. विशाल लापशिया यांनी सांगितलं की, तज्ज्ञांच्या मते, सतत वाकून बसल्यामुळे मणक्याभोवतीचे स्नायू आणि लिगामेंट्सवर अधिक ताण येतो. यामुळे थकवा जाणवणं, शारीरीक ताण आणि संतुलन बिघडू शकतं. तसंच, स्लिप डिस्क किंवा डिस्कच्या इतर समस्यांचा धोका वाढतो. जी भविष्यात एक गंभीर समस्या ठरू शकते.

योग्य शारीरीक स्थिती आणि मणक्यावरील ताण कमी करण्यासाठी खालील टिप्सचा अवलंब करा

  • बसताना पाठीचा कणा सरळ ठेवा

  • संगणकाची स्क्रीन ही डोळ्यांच्या पातळीनुसार ठेवा

  • दर ३० मिनिटांनी थोडा ब्रेक घेऊन उभे राहा किंवा चाला

  • पाठ आणि कंबरेला आधार देणारी खुर्ची वापरा

  • मोबाईल वापरताना मान जास्त वेळ खाली वाकवू नका

  • उभे राहताना वजन दोन्ही पायांवर समान ठेवा

  • जड पिशवी एकाच खांद्यावर धरु नका

  • पाठीला योग्य आधार मिळेल अशा गादीवर झोपा

  • रोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करा

योग्य शारीरिक स्थिती ही केवळ सवय नाही, तर मणक्याच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. वेळीच काळजी घेतल्यास भविष्यातील गंभीर गुंतागुत टाळता येऊ शकते. प्रत्येकाने आपल्या मणक्याच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT