Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : बाळाला जन्म देण्याआधी 'या' चुका टाळा; नंतर होईल पश्चाताप

Ruchika Jadhav

लग्न झाल्यावर प्रत्येक व्यक्ती फॅमिली प्लानींग करत असतो. फ्लॅमिली प्लानींगवेळी बाळाच्या ओढीने प्रत्येक कपल विविध स्वप्न पाहतात. या सर्वांमध्ये महिला प्रेग्नंट असताना विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र बऱ्याचवेळी कपलमध्ये वाद किंवा अन्य काही कारणास्तव चुकीच्या गोष्टी घडतात. याचा पूर्ण परिणाम जन्माला येणाऱ्या बाळावर होण्याची शक्यता असते.

होणाऱ्या बाळाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये असाच विचार प्रत्येक आई करत असते. मात्र अनेकवेळा बाळाच्या जिवाला पोटात असतानाच धोका असल्याचं समजतं. किंवा बाळ जन्माला आल्यानंतर ते फार आजारी पडू लागतं. पालक होणं ही आनंदाची गोष्ट आहे मात्र आपण त्या पाल्ल्याचा निट सांभाळ करू शकणार आहोत की नाही हे पाहणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे आज मुल जन्माला घालण्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबाबत जाणून घेऊ.

आर्थिक परिस्थिती नाजूक असणे

काही कपल फक्त बाळ होणार या विचाराने आनंदी असतात. मात्र बाळाच्या संगोपणासाठी लागणाऱ्या गोष्टीची ते तयारी करत नाहीत. बाळाला जन्माला घालण्याआधी आपली आर्थिक परिस्थिती स्थिर आहे की नाही हे तपासणं गरजेचं आहे. प्रेग्नंसीमध्ये होणाऱ्या आईला सतत मेडीकल टेस्ट कराव्या लागतात. तसेच बाळाच्या खाण्यापिण्यासह औषध पाण्याचा आणि पुढे त्याच्या संगोपणासाठीचा खर्च माता-पिताकडे असणं गरजेचं आहे.

मानसिक तयारी

आपण आई होणार आहोत त्यामुळे प्रत्येक महिलेला मुलाला जन्म द्यायाचा की नाही हा निर्णय घेण्याचा अधिकार असतो. अनेकदा समाज तसेच पती किंवा सासरच्या मंडळींमुळे आपण मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतो. मात्र ही सर्वात मोठी चूक आहे. कारण अशावेळी आईची मानसिक स्थिती ठिक नसते. आईच्या स्वभावात चिडचिड झाल्यास बाळाचा स्वभाव देखील तसाच होतो.

पार्टनरच्या परवानगीशिवाय निर्णय

मुलाला जन्म देताना पती आणि पत्नी दोघांच्या मनाची तयारी असायला हवी. काहीवेळा पती बाळासाठी तयार नसतो. मात्र पत्नी स्वत:च्या मनाने मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेते. हे देखील अत्यंत चूक आहे. कारण आईवर जरी जन्म देण्याची जबाबदारी असली तरी बाबांवर बाळाच्या संगोपणाची जबाबदारी असते. त्यामुळे पार्टनरला विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घ्या.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही प्रेग्नेंसी संबंधीत गोष्टींचा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : दक्षिण रायगडमध्ये जोरदार पाऊसाच्या सरी

IND W vs PAK W: फ्लाईंग Richa Ghosh! वाऱ्याच्या वेगाने डाईव्ह मारत घेतला भन्नाट कॅच; VIDE0

वेडा झालाय का? चक्क वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका, पाकिस्तानमधला Video Viral, नेटकऱ्यांमध्ये संताप

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT