Relationship Tips : पार्टनरसमोर 'या' गोष्टी चुकूनही करू नका; अन्यथा नात्यातली दरी वाढत जाईल

Tips For Healthy Relationships : एक दिवस स्वत:साठी सर्वकाही असलेली व्यक्ती आपला सर्वात मोठा शत्रू बनते. यामधून प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक मुलगी जात असते. त्यामुळे आपलं नातं चांगलं रहावं नात्यात दुरावा येऊनये
Tips For Healthy Relationships
Relationship TipsSaam TV

दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा एकमेकांचा पूर्ण आदर करतात. एकमेकांना समजून घेतात. आपल्या पार्टनरच्या कोणत्याही चुकांवर लक्ष देत नाहीत. सुरुवातीचे काही दिवस फार आनंदात, सुखात आणि शांततेत जातात. मात्र साधारण ६ महिने किंवा एक वर्ष झाल्यानंतर आपल्या नात्यातील अडचणी वाढतात. सतत वाद होतात. काही केल्या वाद थांबत नाहीत.

Tips For Healthy Relationships
Relationship Tips : वेळीच नाही बोलणे शिकून घ्या; आयुष्यभर आनंदी रहाल

वाद इतके टोकाला जातात की, एक दिवस स्वत:साठी सर्वकाही असलेली व्यक्ती आपला सर्वात मोठा शत्रू बनते. यामधून प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक मुलगी जात असते. त्यामुळे आपलं नातं चांगलं रहावं नात्यात दुरावा येऊनये यासाठी आपण स्वत:च्या स्वभावात काही बदल केले पाहिजेत.त्याने नात्यात वाढत चाललेली दरी देखील कमी होईल.

आदर करा

प्रत्येक नातं हे प्रेमासह आदर केल्याने जास्त काळ टिकतं. प्रेम करणे म्हणजेच समोरच्या व्यक्तीचा आदर करणे होय. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहोत त्याचा अनादर होईल असे कधीच वागू नका. समोरच्याच मन दुखावलं जाईल असे शब्द वापरू नका. फुलासाऱ्या नात्याला काट्यासारखे शब्द टोचल्याने नातं कोमेजून जातं. त्यामुळे एकमेकांचा आदर करणे गरजेचं आहे.

जोदीदाराला सुधारण्याचा प्रयत्न करू नका

एकमेकांसह सुरुवातील वेळ घालवताना आपण फक्त आपल्या चांगल्या सवयी समोरच्या व्यक्तीला दाखवतो. त्यामुळे आपली वाईट बाजू किंवा वाईट सवयी समोरच्या व्यक्तीला समज नाहीत. जेव्हा तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या काही वाईट सवयी किंवा तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी समजतील तेव्हा त्याला एकदा समवजवून सांगा. मात्र तो ऐकत नसेल तर सतत त्याच गोष्टीवरून त्याला बोलू नका. कारण अशावेळी आपल्याबद्दल समोरच्या व्यक्तीच्या मनात द्वेश निर्माण होतो.

गृहीत धरू नका

त्याने किंवा तिने अलं केलं असतं तर भांडणं झाली नसती. तो किंवा ती हे करेल किंवा करणार नाही, असे अंदाज बांधणे म्हणजे गृहीत धरणे बंद करा. जेव्हा तुम्ही समोरत्या व्यक्तीस गृहीत धरता तेव्हा तुमच्या अपेक्षांचा भंग होतो. त्यामुळे ताण वाढतो आणि आपल्या पार्टनरशी आपले वाद होतात.

खोटं बोलणं बंद

नातं पारदर्शक असायला हवं. पारदर्शक नातं नसेल तुम्ही तुमच्या पार्टनरशी खोटं बोलत असाल तर आजच ते बंद करा. अनेकदा कुटुंबीय किंवा ऑफिसच्या नावाखाली आपल्या पार्टनरशी खोटं बोलतात. मात्र असं केल्याने ते फक्त समोरच्या व्यक्तीला नाही तर स्वत:ला देखील फसवत असतात. खोटं बोलल्याने नात्यातील दुरावा आणखी वाढतो.

विश्वास ठेवा

नात्यातील दुरावा कमी होण्यासाठी एकमेकांचा आपल्या जोडीदारावर विश्वास असणे गरजेचं आहे. विश्वास नसल्यास वाद वाढतात. आपण आपल्या पार्टनरसाठी फार मेहनत घेऊन देखील आपल्यावर अविश्वास दाखवला जात आहे, याचं वाईट वाटतं. त्यामुळे स्वत:चं मन साफ ठेवा, तसेच जोडीदारावर विश्वास दाखवा.

Tips For Healthy Relationships
Relationship Tips : भांडताना तुमच्याही डोळ्यात अचानक अश्रू येतात; 'या' टिप्सने रडण्यावर कंट्रोल करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com