एखद्या व्यक्तीशी आपले भांडण झाल्यावर अनेकांना अचानक रडू येते. रडणाऱ्या व्यक्तीला कमजोर समजले जाते. आपण रागात असतो तेव्हा देखील आपण रडू लागतो. आपल्या डोळ्यात अश्रू तरळतात. मात्र असे झाल्याने आपले समोरच्या व्यक्तीवर काहीवेळा बॅड इंप्रेशन पडते. खाजगी तसेच प्रोफेशनल दोन्ही लाईफमध्ये या समस्या जाणवतात.
आपल्या पार्टनरसोबत भांडण झाल्यावर आपण दुःखी होतो. त्यानंतर त्याच्याशी भांडताना समोरच्या व्यक्तीचे काही शब्द मनाला फार लागतात आणि आपण रडू लागतो.
प्रोफेशनल लाईफमध्ये आणि ऑफिसमध्ये देखील आपले अनेकांसोबत समज गैरसमज होतात. अशावेळी वाद आणि ताण वाढतो. भांडून आणि आपलं मत मांडून आपण तो वाद मिटवू शकतो. मात्र बऱ्याचदा आपण पटकन रडू लागतो. रडल्यावर आपण सिंपती मिळवण्यासाठी असं करत आहोत असा काहींचा समज होतो. त्यानंतर आपल्यालाच या गोष्टी खटकतात. त्यामुळे रडण्यावर कसं कंट्रोल करायचं ते आज जाणून घेऊ.
कारण समजून घ्या
अनेकदा भांडण सुरू असताना आपण आपल्यासोबत या गोष्टी का होतात असा विचार करून रडतो. मात्र तसे न करता याचे कारण समजून घ्या. त्यामुळे योग्यवेळी योग्य मत मांडणे जमेल.
लक्ष विचलित करा
तुम्हाला मीटिंगमध्ये रडू येत असेल तर स्वतःचं लक्ष दुसरीकडे वाळवा. दीर्घ श्वास घ्या. डोळ्यांची उघडझाप करा. त्याने गरज नसताना आलेले अश्रू निघून जातील.
थोडावेळ शांत रहा
अनेकदा भांडणात आपला सूर वाढतो. आपण मोठमोठ्याने ओरडू लागतो. तुमच्याबरोबर देखील असे होत असेल तर काहीवेळ शांत रहा. कोणत्याही गोष्टी बोलू नका आणि पाणी प्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.