Baba Vanga saam tv
लाईफस्टाईल

Baba Vanga: बाबा वेंगा यांची फोनबाबत हादरवून टाकणारी भविष्यवाणी; वाचून प्रत्येकाचीच झोप उडेल

Baba Vanga Prediction: भविष्यवाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगांना त्यांच्या अचूक अंदाजांमुळे ओळखलं जातं. मृत्यूपूर्वी त्यांनी अनेक गोष्टींबाबत भाकितं वर्तवली होती, ज्याचा प्रभाव आजही जाणवतो.

Surabhi Jayashree Jagdish

जगात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या त्यांना भविष्य पाहता येत असल्याचा दावा करतात. यापैकी काहींच्या भविष्यवाण्या या खऱ्या देखील ठरतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे बाबा वेंगा. बाबा वेंगा यांना त्यांच्या भविष्यवाण्यांसाठी ओखळण्यात येतं. त्यांच्या मृत्यूपूर्वी अशी अनेक भाकितं केली होती जी आजच्या काळात भयावह मानली जातात. बाबा वेंगा यांनी मोबाईल फोनच्या वापराबाबत अशीच एक भविष्यवाणी केली आहे, जी लोकांना आश्चर्यचकित करू शकते.

काय होती बाबा वेंगा यांची भविष्यवाणी?

बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीमध्ये म्हटलं होतं की, २०२२ मध्ये लोक स्क्रीनवर गरजेपेक्षा जास्त वेळ घालवू लागतील. आजकाल आपण पाहिलं तर मोबाईल फोनचं व्यसन वाढताना दिसतंय. हे फक्त एकाच वयोगटातील लोकांमध्येच घडतं असं नाही तर सर्व वयोगटातील लोकांमध्ये मोबाईलच्या वापराचं प्रमाण वाढलंय. मोबाईल फोन, टीव्ही किंवा लॅपटॉप, या सर्व गोष्टींचे व्यसन जणू सर्व जगाला लागलंय.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अभ्यासातून असं दिसून आलंय की, भारतातील सुमारे २४ टक्के मुलं झोपण्यापूर्वी स्मार्टफोन पाहत असतात. सुमारे ३७ टक्के मुलं ही जास्त स्क्रीन टाइममुळे कोणत्याही कामावर योग्यरित्या लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

किती खऱ्या आहेत बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या?

बाबा वेंगांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली होती. याशिवाय, बाबा वांगा यांनी २००४ च्या त्सुनामी, ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेला दहशतवादी हल्ला, स्टॅलिन आणि झार बोरिस III यांच्या मृत्यूच्या तारखा याबद्दल त्यांनी भाकितं केली होती. बाबा वांगा यांनी २०२५ मध्ये तिसरं महायुद्ध सुरू होईल अशीही भविष्यवाणी केलीये.

कोण होते बाबा वेंगा?

बाबा वेंगा यांचा जन्म ३१ जानेवारी १९११ रोजी बल्गेरियात झाला होता. बालपणीच एका वादळात त्याची दृष्टी गेली. पण बाबा वेंगा अशा अनेक भाकितं करायच्या ज्या नैसर्गिक आपत्ती, राजकीय जग किंवा अशा इतर घटनांशी संबंधित होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT