
प्रत्येक व्यक्तीला भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. आपल्याबाबतीत किंवा जगात काय होणार आहे हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. भविष्यवाणी करणारे लोकं जगभर प्रसिद्ध आहेत. मात्र यामध्ये असे काही लोकं आहेत ज्यांच्या भविष्यवाण्यांवर संपूर्ण जग विश्वास ठेवतं. यामध्ये फ्रेंच संदेष्टा नोस्ट्राडेमस आणि बल्गेरियाचे बाबा वेंगा यांची नावं घेतली जातात. ५०० वर्षांपूर्वी नॉस्ट्राडेमसने अनेक महत्त्वाच्या भाकितं केली होती. बाबा वेंगानेही अनेक भाकितं केली आहेत.
बाबा वांगा यांनी सोव्हिएत युनियनचे विघटन आणि अमेरिकेतील दहशतवादी संघटना अल कायदाच्या ९/११ च्या हल्ल्यासह अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. मुख्य म्हणजे या पूर्णपणे खऱ्या देखील ठरल्या होत्या. बाबा वांगा यांचा जन्म १९११ मध्ये बल्गेरियात झाला आणि १९९६ मध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झालं.
बाबा वांगा यांनी भाकीत केलंय की, जगाचा अंत २०२५ मध्ये सुरू होणार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२५ मध्ये युरोपमध्ये एक मोठा संघर्ष सुरू होणार आहे. यामुळे खंडाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्याचप्रमाणे २०२८ मध्ये मानव उर्जेच्या नवीन स्रोताच्या शोधात शुक्र ग्रहावर पोहोचू शकेल. इतकंच नाही तर २०३३ पर्यंत ध्रुवीय बर्फ वितळण्याचं प्रमाण वाढणार असून त्यामुळे समुद्राच्या पातळीमध्ये मोठी वाढ होईल.
बाबा वेंगा यांनी असा दावा केला आहे की, २०४३ मध्ये युरोपमध्ये मुस्लिम राजवट असणार आहे. बाबा वेंगाच्या भाकितानुसार, राजकीय बदल देखील होतील. २०७६ पर्यंत जगभरात कम्युनिस्ट राजवट परत येणार आहे.
बाबा वेंगाच्या भाकीतानुसार, २१७० मध्ये संपूर्ण जगात भयानक दुष्काळ पडणार आहे. ३००५ मध्ये अंतराळात युद्ध होण्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मंगळावर युद्ध होऊ शकतं. यानंतर पृथ्वी कदाचित ३७९७ मध्ये नष्ट होणार आहे. परंतु बाबा वेगां असा दावा केला आहे की, मानव इतर ग्रहांवर जाऊ शकेल. तर ५०७९ मध्ये एका वैश्विक घटनेमुळे संपूर्ण जगाचा अंत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.