ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चष्मा घालणाऱ्या लोकांना अनेकदा चष्मावर डाग आणि स्क्रचेस पडल्यावर अडचणींचा सामना करावा लागतो.
चष्मा स्वच्छ करण्याची पद्धत योग्य असली पाहिजे, नाहितर सर्वात महागडे चष्मे देखील खराब होऊ शकतात.
चष्मा स्वच्छ करण्याआधी हाथ स्वच्छ धुवून घ्या. तुमच्या हातावरील धूळ किंवा घाण काचेवर जाऊ शकते आणि चष्म्यावर डाग पडू शकतात.
चष्मा कोमट पाण्याने धुवा जेणेकरुन काचेवरील धुळ आणि लहान कण निघण्यास मदत होते. नंतर स्क्रचेस साफ करताना काचेवर स्क्रचेस पडत नाही.
चष्मा स्वच्छ करण्यासाठी नेहमी मायक्रोफायबर कापडाचा वापर करा.
अनेक जण त्यांचे चष्मे हे टी-शर्ट, स्कार्फ, टिशू पेपर किंवा रुमालाने स्वच्छ करतात. पण असे केल्यास चष्मा खराब होण्याची शक्यता असते.
चष्मा स्वच्छ करताना जास्त दाब देऊ नका. हळूवारपणे साफ केल्याने काचेचे नुकसान होत नाही.
जर तुम्ही दररोज चष्मा वापरत असाल तर, तो नियमितपणे स्वच्छ करावा.