Ashadhi Ekadashi Importance Saam Tv
लाईफस्टाईल

Ashadhi Ekadashi Importance: यावर्षी 5 महिने निद्रावस्थेत राहतील भगवान विष्णू, जाणून घ्या आषाढी एकादशीचे महत्त्व

कोमल दामुद्रे

Ashadhi Ekadashi Katha : हिंदू धर्मात एकादशी ही अधिक महत्त्वाची मानली जाते. ही तिथी महिन्यातून दोनदा येते. शुक्ल पक्ष व कृष्ण पक्षात. असे म्हटले जाते की, निर्जला, देवशयनी आणि देवोत्थान एकादशी या तिथी फार महत्त्वाच्या मानल्या जातात.

यंदा आषाढ महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशी गुरुवारी २९ जून २०२३ रोजी येत आहे. त्याला देवशयनी एकादशी व आषाढी एकादशी असे म्हटले जाते. या दिवसापासून भगवान श्री हरी चार महिने निद्रावस्थेत जातात असे मानले जाते, परंतु यावर्षी अधिक मासामुळे श्रावण हा २ महिने आहेत. यावेळी ५ महिने भगवान विष्णून निद्रावस्थेत जाणार आहे. देवउठनी एकादशी म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२३ ला ते झोपेतून जागे होतील.

असे म्हटले जाते की, भगवान विष्णू या काळात निद्रावस्थेत जातात. यामुळे या काळात पूजा, विवाह (Marriage), मुंडण, गृहप्रवेश आदी सर्व प्रकारची शुभ कार्ये पुढे ढकलली जातात. एकादशीपासून (Ekadashi) पुन्हा देवोत्थान सुरू होते.

महत्त्व

भारतात (India) आषाढी एकादशीपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासाचे प्राचीन काळापासून गृहस्थ, संत, महात्मा आणि साधक यांच्यासाठी विशेष महत्त्व आहे. योग, ध्यान आणि साधना यांना जीवनात महत्त्वाचे स्थान आहे, कारण यामुळे सुप्त शक्तींचे पुनर्जागरण होते आणि अक्षय ऊर्जा जमा होते. त्याचे प्रतिपादन हरिशयनी एकादशीपासून केले जाते. जेव्हा भगवान विष्णू स्वतः योगनिद्राचा आश्रय घेऊन चार महिने ध्यान करतात. देवशयनी एकादशी व्यतिरिक्त आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला हरिशयनी किंवा शेषशयनी, पद्मनाभ किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात, कारण श्री हरी यांना या नावांनीही संबोधले जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली घटनास्थळी भेट

मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT