Pandharpur Vitthal Wari: हिंदू पंचागानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. त्यातील प्रत्येक एकादशीचे स्वत:चे असे विशिष्ट महत्त्व असते. वर्षाला एकूण मिळून २४ एकादशी असतात तर अधिक मास आल्यास २६ एकादशी होतात.
हिंदू पंचागातील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला (Ekadashi) आषाढी एकादशी अर्थातच देवशयनी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी (Celebrate) केली जाते. ही एकादशी वारकरी सांप्रदायांसाठी हा दिवस अधिक महत्त्वाचा असतो. महिन्याभरापासूनच वारकरी अनवाणी पायाने आपल्या विठ्ठलाच्या दर्शनांची आतूरतेने वाट पाहात असतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.
या दिवशी राज्यातील विविध भागांतून वारकरी पंढरपूरात दाखल होतात. संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत (Tukaram Maharaj) अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरात मार्गस्थ होतात. विठूनामाचा गजर करत लाखों वारकरी आपल्या देवाची भेट घेतात. जाणून घेऊया यंदा आषाढी एकादशी कधी आहे ते.
1. आषाढी एकादशी कधी आहे ?
यंदा आषाढी एकादशी ही गुरुवारी, २९ जून २०२३ रोजी येत आहे. पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी प्रारंभ होत असून ३० जून २०२३ रोजी पहाटे २ वाजून ४२ मिनिटांनी समाप्त होईल.
हिंदू पंचागानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे यंदा गुरुवारी २९ जूनला सर्वत्र साजरी करण्यात येईल.
2. पूजा विधी पद्धत
विठ्ठलाला विष्णूचा अवतार मानले जाते. यामुळे प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरात भाविकांची गर्दी असते. असे म्हटले जाते की, एकादशीला पहाटे उठून स्नान करावे. तुळस वाहून विष्णूपूजन करावे. या दिवशी दिवसभर उपवास करावा असे देखील म्हटले जाते. मुखात विठ्ठलाचे सतत नामस्मरणही करावे. तर दुसऱ्या दिवशी वामनाची पूजा करुन पारणं सोडावे. या दोन्ही दिवशी तुपाचा दिवा लावून विष्णू देवाची पूजा (Puja) अर्चना करावी.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.