Ashadhi Ekadashi Wari Special: भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल... आषाढी एकादशी म्हटलं की, डोळ्यासमोर उभे राहाते ते विठ्ठलाचे रुप. हिंदू धर्मात आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते. यंदा ही एकादशी २९ जूनला येत आहे.
आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक वारकरी विठ्ठलाच्या भेटीला जातात. चंद्रभागेच्या तिरी जाऊन स्नान करुन विठ्ठलाचे दर्शन घेतात. गावोगावातून दिंडी घेऊन वारकरी पंढरपूरला भेट देतात. टाळ- मृदुंग व हरि नामाचा जप करत असंख्य वारकरी पंढरपूराकडे निघतात.
पण हल्लीच्या काळात प्रत्येकालाच पंढरपूरला (Pandharpur) जाणे शक्य होत नाही. कामामुळे किंवा वयोमानानुसार अनेकांना आपल्या विठूरायाचे दर्शन घ्यायला जमत नाही. पंरतु जर तुमची यंदाची वारी चुकली असेल तर मुंबईतच वसलेल्या विठूरायाचे दर्शन तुम्हाला घेता येईल. मुंबईत या ६ ठिकाणी आषाढी एकादशी जल्लोषात साजरी (Celebrate) केली जाते. टाळ मुदृंगाच्या गजरात ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात तल्लीन झालेले वारकरी आपल्याला मुंबईतही पाहायला मिळतील. पाहूयात मुंबईत असलेले पंढरपूर कुठे आहे ते.
1. विठ्ठल रखुमाई मंदिर - वडाळा
४०० वर्षांपूर्वीपासूनचे हे विठ्ठल मंदिराने (Vitthal Rakhumai Mandir - Wadala) वडाळ्याला नवी ओळख दिली. या मंदिराला प्रतिपंढरपूर म्हणूनही ओळखले जाते. मुंबईतील सात बेटांपैकी एक बेट हे वडाळा म्हणून पूर्वी ओळखले जायचे. असे म्हटले जाते की, पूर्वी वडाळा या भागात मिठागरांसाठी ओळखले जायचे. इथे राहाणारे बहुतेक व्यापारी मिठाचा व्यापार करत. एक दिवस काम करताना या मिठागरात काम करताना त्यांना विठ्ठल व रखुमाईची मूर्ती सापडली असता त्यांना पंढरपूरला जाऊन तुकाराम महाराजांना सांगितले. तेव्हा तेथील व्यापाऱ्यांनी विठ्ठल व रखुमाईचे मंदिर स्थापन केले. आजही या मंदिराला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भाविकांची गर्दी असते. या दिवशी या ठिकाणी एक दिवसीय मेळा देखील भरतो. हे मंदिर वडाळा बस डेपोजवळ, सेंट्रल रेल्वे कॉलनी, कात्रक रोड वडाळा (पूर्व)
2. विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट - सायन
सायन (Vitthal Rakhumai Mandir Trust - Sion) या ठिकाणी विठ्ठल रखुमाईचे मंदिर हे १२५ वर्षे जुने आहे. येथे विठ्ठल रखुमाईच्या मंदिराची स्थापना ही १८९३ साली करण्यात आली. असे म्हटले जाते की, श्री दामोदर खरे महाराज हे १८६० साली मुंबईत आले व शिवगावात स्थित झाले. दामोदर खरे एकदा पंढरपूरला देले असता ते तेथील सोहळा पाहून प्रभावित झाले. पंढपूरवरुन घरी येताना त्यांना धातूच्य मूर्ती आणल्या, या मूर्ती चोरीला जाऊ नये म्हणून त्यांनी विठ्ठल रखुमाईच्या पाषाण मूर्ती घरात ठेवल्या. तेथील स्थानिकांच्या आग्रहा खातर या मंदिराची स्थापना करण्यात आली. या मंदिराची खासियत अशी आहे की, सणानुसार या विठ्ठल रखुमाईची वेशभूषा बदली जाते. हे मंदिर आशिर्वाद अपार्टमेंट, लक्ष्मीबाई केळकर मार्ग, सायन मेन रोड, सायन फ्लायओव्हर जवळ सायन (पश्चिम)
3. विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट - माहीम
माहीम येथील विठ्ठल रखुमाईचे मंदिर हे ९६ वर्ष जुनं असून १९१६ साली बांधण्यात आले. १९१४-१५ साली माहीमध्ये प्लेगची साथ पसरली असता. एका व्यक्तीने या विभागात विठ्ठल रखुमाईचे मंदिर स्थापन करण्यास सांगितले. या मंदिरात प्रवेश करताच गणेशाची व गरुडाची मूर्ती नजरेस पडते. हे मंदिर मोरी रोड पोस्ट ऑफिसच्या समोर, माहीम (Vitthal Rakhumai Mandir Trust In Mahim) फाटक जवळ आहे.
4. विठ्ठल रखुमाई मंदिर - विलेपार्ले
विलेपार्ले येथे ८१ वर्ष जुने असून १९३५ साली या विठ्ठल रखुमाई मंदिराची स्थापना करण्यात आली. हे मंदिर लक्ष्मीदास गोकुळदास तेजपाल यांच्या मुलीच्या जन्मदिनानिमित्त बांधले असे म्हटले जाते. मंदिरात प्रवेश करताच त्याबद्दल थोडक्यात माहीती देणारा शिलालेख नजरेस पडतो. या मंदिरात विठ्ठल रखुमाईसोबत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरवरांचे फोटो देखील आहे. हे मंदिर तेजपाल स्कीम रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे आहे. (Vitthal Rakhumai Mandir In Vileparle)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.