Pandharpur Wari Travel Guide: हिंदू पंचागातील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी अर्थातच देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते. ही एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा आषाढी एकादशी ही गुरुवारी, २९ जून २०२३ रोजी येत आहे.
असंख्य वारकरी सांप्रदायांसाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी महिनाभरापूर्वीच टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरपूराकडे कूच करतात.
अनेक लोक आषाढी एकादशी (Ekadashi), कार्तिक एकादशी किंवा देवदर्शनासाठी या ठिकाणी भेट देतात. पण यंदा काही कारणास्तव तुमची वारी चुकली असेल आणि तुम्हाला एका दिवसात पंढपूरला जायचे असेल तर तुम्ही अशाप्रकारे जाऊ शकता.
महाराष्ट्रातील (Maharashtra) सोलापूर शहराच्या पश्चिम बाजूला भीमा नदीच्या काठावर वसलेले तीर्थक्षेत्र आहे. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊली म्हणजे पांडुरंग. पुरातन काळापासून याची तुलना वैकुंठाशी केली आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Temple), भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी रुक्मिणी यांना समर्पित मंदिर याच गावात आहे. या मंदिरात भगवान श्रीकृष्ण आणि देवी रुक्मिणी यांच्या काळ्या रंगाच्या सुंदर मूर्ती आहेत. हे मंदिर आजही अनेकांचे अखंड श्रद्धास्थान आहे. या मंदिरात विठोबाच्या वेशात श्रीकृष्णाची पूजा केली जाते.
पंढरी हे पंढरपूराचे दुसरे नाव आहे. या गावापासून पुणे सुमारे २०० किलोमीटर अंतरावर आहे. येथे विठ्ठलाचे जगप्रसिद्ध मंदिर पाहायला मिळेल. या मंदिरात भगवान विठ्ठल व देवी रुक्मिणी या दोघांची प्रतिष्ठापना आहे. भगवान विठ्ठलाला विठोबा, पांडुरंगा आणि पंढरीनाथ या नावानेही ओळखले जाते. जर तुम्हालाही तुमच्या लाडक्या विठुरायाला यंदाच्या आषाढी एकादशीला भेट द्यायची असेल तर कोण कोणत्या मार्गाने जाता येईल हे पाहूया.
पंढरपूरला कसे जायचे ?
1. रेल्वेने (Railway) :
पंढरपूरला जाण्यासाठी कुर्डुवाडी रेल्वे जंक्शन जोडला जातो. पण लातूर व मुंबईवरुन जाण्यासाठी अनेक एक्सप्रेस आहेत. लातूर एक्सप्रेस (२२१०८), मुंबई एक्सप्रेस (१८०३२), हुसेनसागर एक्सप्रेस (१२७०२), आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस (१२११६) यासह अनेक गाड्या नियमितपणे मुंबईवरुन जाण्यासाठी कुर्डुवाडी जंक्शनला थांबतात. तसेच पंढरपूरहून मुंबईला जाणारी, पुण्यातून जाणारी रेल्वेही आहे.
2. रस्त्याने
जर तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा नसेल तर तुम्ही बसने प्रवास करु शकता. यासाठी मुंबई- पंढरपूर, मिरज -पंढरपूर, लातुर - पंढरपूर, उस्मानाबाद - पंढरपूर या बसेस रोज धावतात.
3. हवाईमार्गे
जर तुम्हाला काही तासांचे अंतर कापून विठूरायाचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही विमानाने देखील प्रवास करु शकता. पंढरपूरपासून जवळ असणारी विमानतळे पुणे व सोलापूर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.