Raw Banana Tikki Recipe  Saam Tv
लाईफस्टाईल

Ashadhi Ekadashi Upvas Recipe : उपवासाला घरच्या घरी बनवा कच्च्या केळ्याची टिक्की; पाहा रेसिपी

Raw Banana Tikki Recipe : आज आम्ही तुम्हाला सोप्या ट्रिक्सच्या मदतीने कच्च्या केळ्याची टिक्की कशी बनवायची हे सांगणार आहोत.

कोमल दामुद्रे

Upvasacha Padarth : आज आषाढी एकादशी. विठूरायाच्या दर्शनासाठी अनेकजण पंढरपूरात दाखल झाले असतील. तर काहींना आज उपवासही केला असेल. उपवासानिमित्त साबुदाणाची खिचडी, साबुदाणाचे वडे, वरीचे तांदूळ अशाप्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार केल्या जातात.

अनेकजण फक्त फळे खाऊन दिवसभर विठूरायाचे नामस्मरण करतात. जर आज तुमचाही उपवास असेल आणि मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर भरमसाट केळी मिळाल्या असतील. अशावेळी त्याचे काय करावे हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या ट्रिक्सच्या मदतीने कच्च्या केळ्याची टिक्की कशी बनवायची हे सांगणार आहोत. पाहा रेसिपी

1. साहित्य

कच्ची केळी (Banana) - ३

हिरव्या मिरच्या - २

उकडलेला बटाटा (potato) - 1/4 कप

जिरे - १ चमचा

मीठ - चवीनुसार

तळण्यासाठी तेल (Oil)- १/२ कप

शिंगाड्याचे पीठ- १/२ वाटी

तीळ - १ वाटी

2. कृती

  • कच्च्या केळीची टिक्की घरी बनवण्यासाठी सर्वप्रथम कच्ची केळी उकळून सोलून घ्या. यानंतर ते एका भांड्यात चांगले मॅश करा.

  • त्यानंतर हिरव्या मिरची, उकडलेला बटाटा मॅश करुन घ्या. तयार मॅश केलेली केळी देखील त्यात घालून मिश्रण एकजीव करा.

  • त्यानंतर यात मीठ, जिरे, शिंगाड्याचे पीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करा

  • कढईत तेल टाकून गॅसवर गरम होण्यासाठी ठेवा. आता भांड्यात ठेवलेले मिश्रण थोडेसे हातात घेऊन गोल टिक्की बनवा आणि प्लेटमध्ये ठेवा.

  • मिश्रणापासून बनवलेल्या या टिक्की एका भांड्यात ठेवा. त्यानंतर तयार टिक्कीला वरुन तीळ लावा व त्यानंतर तेलात तळून घ्या

  • तेलात तळून घेतल्यावर टिक्कीची चव आणखी कुरकुरीत होईल. तुमची कच्च्या केळीची टिक्की तयार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भाजपनं सोडली अमित ठाकरेंची साथ? सरवणकरांच्या रॅलीत कमळाचे झेंडे

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा जोरदार पाऊस! १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Horoscope Today : काहींना लक्ष्मी प्राप्तीसाठी सुसंधी मिळतील, तर कोणाला होईल आजाराचे निदान, तुमची रास काय?

Raosaheb Danve: खरंच नेते म्हणायचं का? फोटोत येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी मारली लाथ

Daily Horoscope: आजचा शुभ दिवस देणार बरंच काही; वाचा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT