कोमल दामुद्रे
तीर्थक्षेत्र पंढरपुरातील श्री विठुरायाची मूर्ती ही स्वयंभूम आहे.
श्री विठुरायाच्या मस्तकावरील मुकूट हा पारशी लोकांच्या टोपीसारखा दिसतो. याला शिवलिंग असे म्हटले जाते.
विठुरायाच्या गळ्यात कौस्तुभ मण्यांचा कोरलेला कंठ आहे तो छातीवर भारदस्तपणे दिसून येतो.
भृगू ऋषींनी केलेल्या प्रहाराचे म्हणजेच भृगूलांच्छनाची विठूरायाच्या छातीवर खूण दिसून येते.
विठ्ठलाच्या कंबरेला करदोडा आहे याला तीनपदरी मेखला असेही म्हणतात.
श्री विठुरायाचा डाव्याप्रमाणेच उजवाही हात कंबरेवर असून तो उघडा आहे. त्या हाताचा अंगठा वळलेला असून त्यात कमलपुष्पाचा देठ आहे.
देवाने वस्त्र नेसले असून, त्याचा सोगा दोन्ही पायाच्या मधोमध म्हणजे धुंगूरवाळी काठीच्या वरील बाजूस मूर्तीवर दिसून येतो.
श्री विठूराया हे श्री कृष्ण अवतारात गुराखीही होते. त्याची साक्ष पटवणारी एक खूण देवाच्या मूर्तीवर आजही दिसून येते ती म्हणजे, देवाच्या दोन्ही पायांमध्ये एक घुंगूरवाळी काठी आहे.
श्री विठूरायाच्या चेहरा किंचितसा उमट आकाराचा वाटतो. परंतु देवाच्या मुकुटामुळे तसा भासतो. गाल गोल व फुगीर आहेत.
देवाच्या कानात मकरकुंडले असून, ती खांद्यावर विसावल्यासारखी दिसून येतात. श्री विठुरायाच्या दोन्ही दंडामध्ये बाहुभूषण कडी आहेत. देवाच्या दोन्ही मनगटांत दोन कडी आहेत.
महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णाने सकाळी शंख फुंकल्यावर युद्ध सुरू होत असे व सायंकाळी शंख फुंकल्यावर बंद होत असे. पंढरीचा विठुराय हा श्रीकृष्णाचाच अवतार आहे. त्याची खूण म्हणजे देवाच्या डाव्या हातात शंख आहे.
मुक्तकेशी नावाची एक दासी होती. तिला तिच्या सौंदर्याविषयी खूप गर्व होता. ती विठुरायाच्या दर्शनाला आली तेव्हा तिने देवाच्या पायाला स्पर्श करताच तिची बोटं देवाच्या पायात रुतली. तेव्हा तिला उपरती झाली की. माझ्या सौंदयपेक्षाही श्री विठुरायाचे सौंदर्य खूप कोमल आहे. त्या मुक्तकेशीची बोटं रूतल्याची खूण पायावर आहे
श्री विठुराय दोन्ही पाय जुळवून उभे असलेली वीट ही भक्तराज पुंडलिकाने दिलेली आहे. ही वीट सुमारे एक चौरस फूट आकाराची आहे