Ashadhi Ekadashi Upvas Recipe : साबुदाण्याची खिचडी खाऊन वैतागले आहात ? मग ट्राय करा साबुदाण्याचे लाडू, पाहा रेसिपी

Sabudhanyache Ladoo : आज आम्ही तुम्हाला अशी एक सोपी रेसिपी सांगणार आहोत ज्याची चव चाखताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल.
Sabudhanyache Ladoo
Sabudhanyache LadooSaam Tv
Published On

Upvasacha Padarth : आषाढी एकादशी म्हटलं की, अनेकांच्या घरी व्रत करण्याची तयारी एक ते दोन दिवसांपूर्वीपासूनच सुरु होते. या दिवशी अनेक वारकरी आपल्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. तर काही लोक उपवास देखील करतात.

उपवासाच्या दिवशी हमखास बनवली जाते ती साबुदाण्याची खिचडी. काही लोकांना ही खिचडी खाऊन खाऊन अक्षरक्ष: नाकी नऊ येतात. यामुळे अनेकांना अपचनाचा त्रासही होतो पण आज आम्ही तुम्हाला अशी एक सोपी रेसिपी सांगणार आहोत ज्याची चव चाखताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. पाहूयात साबुदाण्याचे लाडू कसे बनवावेत.

Sabudhanyache Ladoo
Ashadhi Ekadashi Upvas Recipe: आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा उपावासाचा चाट, झटपट बनेल

1. साहित्य

साबुदाणा - १ कप

किसलेला ओला नारळ - १ कप

साखर (Sugar) - १ कप

तूप (Ghee) - १ कप

छोटी वेलची - ४

काजू- १ मोठा चमचा

बदाम (Almond) - १ मोठा चमचा

Sabudhanyache Ladoo
Akshaya Naik : ही सुंदरा खरचं मनामध्ये भरली...

2. कृती

  • साबुदाण्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅन घ्या. त्यामध्ये साबुदाणा घालून मंद आचेवर कोरडा भाजून घ्या

  • साबुदाणा हलका सोनेरी रंगाचा होऊन कुरकुरीत दिसू लागल्यास गॅस बंद करा. थंड होण्यास ठेवा.

  • थंड झालेल्या साबुदाण्याला मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक अशी पावडर करुन घ्या

  • आता एका पातेल्यात किसलेले खोबरे भाजून घ्या. खोबरे हलके सोनेरी झाल्यावर त्यात साबुदाणा पावडर, साखर घालून गॅस बंद करा.

Sabudhanyache Ladoo
Ashadhi Ekadashi Wishes : सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी...,आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्तांना याप्रकारे पाठवा शुभेच्छा !
  • आता एका छोट्या कढईत तूप टाकून गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात चिरलेले काजू घाला.

  • 1-2 मिनिटे भाजल्यानंतर साबुदाण्याचे मिश्रण पॅनमध्ये घाला. यानंतर वेलची पूड घाला आणि मिश्रण चांगले मिसळा. मिश्रण थोडे गरम झाल्यावर लाडू बनवा.

  • लाडू थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा आणि हा उपवासाच्या लाडवाची चव कधीही चाखता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com