Ashadhi Ekadashi Upvas Recipe: आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा उपावासाचा चाट, झटपट बनेल

Upvasacha Padarth : आज आम्ही तुम्हाला असा पदार्थ सांगणार आहोत की, जो पटकन बनेल व तुम्हाला आवडेल देखील.
Ashadhi Ekadashi Fasting Recipe
Ashadhi Ekadashi Fasting RecipeSaam Tv
Published On

Upvasache Chat : अवघ्या काही दिवसातच आषाढी एकादशी येत आहे. घरातील बहुतेक जणांच्या या दिवशी उपवास असणार. काहीच्या घरी तर आजपासूनच याची उपवासाला कोणते पदार्थ बनवायचे याची सुरुवात झाली असेलच.

अनेकांना फास्ट फूड खाण्याची सवय असते. उपवासाच्या दिवशी तेच तेच पदार्थ खाण्याचा अनेकांना कंटाळा येतो. या दिवशी आपण आपला आहारात कसा ठेवायला हवा ? आपल्या थाळीत कोणते उपवासाचे आरोग्यदायी पदार्थ असायला हवे ते पाहूया.

Ashadhi Ekadashi Fasting Recipe
Ashadhi Ekadashi Shubh Muhurt: 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल...', यंदा आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी व वेळ

उपवासाच्या (Fast) दिवशी कोणता पदार्थ बनवायचा यांची चिंता महिला वर्गाला अधिक असते. परंतु, आज आम्ही तुम्हाला असा पदार्थ सांगणार आहोत की, जो पटकन बनेल व तुम्हाला आवडेल देखील. पाहूयात उपवासाच्या चाटची रेसिपी (Recipe).

1. साहित्य -

  • शिंगाडा पीठ - १ वाटी

  • शिंगाड्याची शेव - १ वाटी

  • उकडलेल्या बटाट्याचा किस - १ वाटी

  • चिरलेली हिरवी मिरची - ३

  • मीठ

  • पाणी

  • तूप - २ चमचे

  • भिजवलेला साबुदाणा- 1/2 वाटी

  • साखर (Sugar)

  • कोथिंबीर

  • ओले खोबरे-1/2 वाटी

  • काजू-बदाम- पाव वाटी

  • दही- २ चमचे

  • शेंगदाण्याचा कूट

  • चाट मसाला

Ashadhi Ekadashi Fasting Recipe
How To Reach Pandharpur: आस लागली तुझ्या दर्शनाची; विठ्ठलभक्तांना कमी वेळेत पंढरपूर गाठण्यासाठीचे पर्याय

2. कृती -

  • सर्वप्रथम कढई ठेवून तूप घालावे. त्यात साबुदाणा घालून चांगला परतवा.

  • त्यानंतर मीठ, साखर व हिरव्या मिरचीचे तुकडे घालून गॅसवर परतवा व वरुन कोथिंबीर घालावी.

  • त्यानंतर शिंगाड्याची शेव, त्यावर उकडलेल्या बटाट्याचा कीस, दाण्याचे कूट, चिमूटभर मीठ, तयार साबुदाणा, ओले खोबरे, काजू, बेदाणे, 2 चमचे दही घालावे. वरून कोथिंबीर व चाट मसाला भुरभुरून उपवासाचे चॅट सर्व्ह करावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com